यंदाची ‘टेक्नो-सोसायटल ’ आंतरराष्ट्रीय परिषद ऑनलाईन होणार


प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे यांची माहिती


पंढरपूर : ईगल आय मीडिया

‘ यंदाच्या वर्षी कोरोना महामारीमुळे तिसरी आंतराष्ट्रीय परिषद ‘टेक्नो-सोसायटल २०२०’ ही दि.११ आणि दि.१२ डिसेंबर २०२० रोजी ऑनलाईन पद्धतीने होणार आहे.’ अशी माहिती स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे यांनी दिली. ‘समाजाच्या विकासासाठी तंत्रज्ञानाचा वापर’ हा या परिषदेचा गाभा असणार आहे. या परिषदेमध्ये खालील मुद्द्यांवर भर असणार आहे: यापूर्वी २०१६ साली पहिली व २०१८ साली दुसरी आंतराष्ट्रीय परिषद संपन्न झालेली आहे.


आज बुधवार ( दि.९ रोजी ) ‘पत्रकार परिषेदे’चे आयोजन केले होते. पुढे बोलताना डॉ.रोंगे म्हणाले की, ‘कॉलेज ऑफ इंजिनिअरींग पंढरपूर मधील मेकॅनिकल इंजिनिअरींग, सिव्हील इंजिनिअरींग, कॉम्प्यूटर सायन्स अॅन्ड इंजिनिअरींग, इलेक्ट्रोनिक्स अॅन्ड टेलेकम्युनिकेशन इंजिनिअरींग या शाखांना ३० जून २०२३ पर्यंत एन.बी.ए. चे मानांकन मिळालेले आहे. टेक्नो-सोसायटल २०२० ही तिसरी आंतराष्ट्रीय परिषद दि.११ आणि १२ डिसेंबर २०२० रोजी होणार आहे.

या तिसऱ्या आंतराष्ट्रीय परिषदे साठी डॉ. विजय जोशी हे प्लेनरी स्पीकर व प्रमुख उद्घाटक म्हणून लाभलेले आहेत. त्यांना ‘ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया हा पुरस्कार मिळालेला आहे. या परिषदेत ‘कि नोट स्पीकर’ म्हणून विविध देशातील खालील संशोधक व अभ्यासक सहभागी आहेत. डॉ.विजय जोशी (ऑस्ट्रेलिया), डॉ. थॉमस मबुया (नैरोबी), बोतीर उस्मानोव्ह (उझबेकिस्तान), डॉ.एस.पी. अरुण (भारत), डॉ. यल्लोजी राव (अमेरिका), डॉ. मृणालिनी पत्तर्कीन (अमेरिका), या परिषदेसाठी जवळपास ३०० प्राध्यापक/ संशोधकांनी नोंदणी केली असून जवळपास ३५० संशोधनपर लेख सबमिट करण्यात आलेले आहेत., सर्व संशोधनपर लेख हे स्प्रींजर या आंतरराष्ट्रीय प्रकाशनाच्या माध्यमातून प्रसिद्ध केले जाणार आहेत.

स्वेरीतील शैक्षणिक अधिष्ठाता डॉ. प्रशांत पवार यांना केंद्र शासनाच्या एआयसीटीई कडून ‘विश्वेश्वरय्या बेस्ट टीचर अवार्ड’ पहिल्या क्रमांकाने प्रदान करण्यात आलेला आहे. स्वेरी अभियांत्रिकी महाविद्यालयाकडून विद्यार्थी व पालकांना प्रवेश प्रक्रियेबाबत मार्गदर्शन करण्यासाठी प्रवेश प्रक्रिया मार्गदर्शन कक्ष स्थापन करण्यात आलेला आहे. तरी विद्यार्थी व पालकांनी या मार्गदर्शन कक्षाचा लाभ घ्यावा. स्वेरी अभियांत्रिकीमध्ये विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज भरणे, कागदपत्रे अपलोड करणे इ. बाबींसाठी ‘प्रवेश प्रक्रिया सुविधा केंद्र’ सुरु करण्यात आले आहे.

या पत्रकार परिषदेला स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे यांच्या समवेत संस्थेचे अध्यक्ष नामदेव कागदे, युवा विश्वस्त प्रा. सुरज रोंगे, शैक्षणिक अधिष्ठाता डॉ. प्रशांत पवार आदी उपस्थित होते.

Leave a Reply

error: Content is protected !!