स्वेरीच्या निकिता भागवत यांना तायक्वांदो मध्ये रौप्य पदक

photo    स्वेरीच्यावतीने विश्वस्त डॉ. सुरज रोंगे यांनी निकिता चे अभिनंदन केले.  

पंढरपूर ; eagle eye news


 गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील स्वेरीच्या सिव्हील इंजिनिअरिंग विभागात अंतिम वर्षात शिक्षण घेणाऱ्या निकिता विठ्ठल भागवत यांनी रौप्य पदक पटकावले.  सांगोला येथील विज्ञान महाविद्यालयामध्ये आयोजित केलेल्या विद्यापीठ स्तरीय तायक्वांदो स्पर्धेमध्ये निकिता विठ्ठल भागवत यांनी ६३ किलो ते ६७ किलो या वजन गटात  रौप्य पदक पटकावले. याबद्दल स्वेरीच्या वतीने विश्वस्त डॉ. सुरज रोंगे यांनी निकिता चे अभिनंदन केले.


          निकिता भागवत यांना स्वेरी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे क्रीडा मार्गदर्शक प्रा.संजय मोरे यांचे मार्गदर्शन लाभले आहे. स्वेरीतील विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच उत्तम आरोग्यासाठी विद्यार्थ्यांकडून नियमित योगा करून घेतला जातो. निकिता भागवत यांनी तायक्वांदो स्पर्धेमध्ये सिल्वर मेडल पटकविल्यामुळे त्यांचा स्वेरीचे युवा विश्वस्त प्रा.सुरज रोंगे व डॉ.एम.एम.पवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.


या यशाबद्दल स्वेरीचे संस्थापक सचिव व प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे, संस्थेचे अध्यक्ष दादासाहेब रोंगे, उपाध्यक्ष हनीफ शेख तसेच संस्थेचे विश्वस्त व पदाधिकारी, स्वेरी कॅम्पसचे इन्चार्ज प्रा.एम. एम.पवार, शैक्षणिक अधिष्ठाता व सिव्हील इंजिनिअरिंगचे विभागप्रमुख डॉ.प्रशांत पवार यांनी  निकिता भागवत यांचे अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!