तहसीलदार वैशाली वाघमारे यांची बदली

पंढरीत पेढे वाटून साजरा झाला आनंदोत्सव !

पंढरपूर : ईगल आय मीडिया

पंढरपूरच्या तहसीलदार वैशाली वाघमारे यांची ची बदली झाली म्हणून बळीराजा शेतकरी संघटना यांचे वतीने आज नामदेव पायरी जवळ पेढे वाटून आनंद उत्सव साजरा करण्यात आला. तहसीलदार वाघमारे यांच्या कार्यपद्धतीबाबत सर्व सामान्य नागरिकांत नाराजी व्यक्त होत होती.

वाळू तस्करी बेसुमार सुरू आहे. सर्वसामान्य गोर-गरिबांची रेशन कार्ड असेल, तहसील मधली कामे वेळेवर केली जात नव्हती. पूरग्रस्त अनुदान, 2017-18 सालचे दुष्काळ अनुदान, अवकाळी अनुदान यामध्ये अनेक तक्रारी होत्या. त्या सोडवण्यासाठी काहीही प्रयत्न झाले नाहीत. शेतकऱ्यांच्या मुलांचे दाखलेही लवकर मिळत नव्हते. तसेच तहसीलदार वाघमारे कोणाचाही फोन उचलत नव्हत्या. अवैध वाळू वाहतूक जोरात चालू होती अनेक वेळा अनेक संघटनांनी तक्रारी केल्या होत्या.

ग्रामपंचायत निवडणुकी बाबत आलेल्या नागरिकांच्या हकरती ना थेट केराची टोपली दाखवली गेली. अशा अनेक प्रकारच्या तक्रारी होत्या. बळीराजा शेतकरी संघटनेने थेट मुख्यमंत्र्यांकडे निवेदन देऊन तहसीलदार वाघमारे यांची बदली करा अशी मागणी केली होती. बळीराजा संघटनेने अनेक वेळा पालक मंत्री दत्तामामा भरणे, जिल्हाधिकारी, प्रांत अधिकारी यांच्याकडे बदलीची मागणी केली होती.

या मागणीची दखल घेत महाराष्ट्र सरकारने आज तातडीने बदली आदेश दिला. त्याबद्दल महाराष्ट्र सरकारचे अभिनंदन करीत बळीराजा शेतकरी संघटनेच्या वतीने श्री विठ्ठल मंदिराच्या समोर संत नामदेव पायरी जवळ पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला.


यावेळी बळीराजाचे माऊली हळणवर, सामाजिक कार्यकर्ते उत्तम बाबा चव्हाण, अण्णा सलगर, वैभव भूमकर, संतोष बंडगर, विजू माळी, नरसप्पा वाघमोडे, अमोल कोळी यांच्यासह बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते

Leave a Reply

error: Content is protected !!