बाजीराव विहीर चौक धोक्याचा बनला
पंढरपूर : ईगल आय मिडिया
वाखरी ( ता.पंढरपूर ) येथील बाजीराव विहीर जवळील वळणावर आज सकाळी टँकर पलटी झाला आहे. या ठिकाणी अत्यंत धोकादायक वळण असल्याने वाहनचालकाचे वळणात नियंत्रण सुटले आणि टँकर पलटी झाला आहे. बाजीराव विहीर जवळ असलेल्या वळण रस्त्यावरच आज सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास पंढरपूर कडे निघालेला टँकर पलटी झाला. टँकर रस्त्यावरच आडवा झाल्याने काही वेळ वाहतूक विस्कळित झाली होती. नंतर दोन क्रेन बोलावून टँकर रस्त्याच्या बाजूला काढण्यात आला आणि वाहतूक सुरळीत झाली.
दरम्यान, या अपघातामुळे राष्ट्रीय महामार्गाच्या कामातील तांत्रिक दोष उघड झाले आहेत. बाजीराव विहीर वाचवण्यासाठी येथून बाह्यवळण रस्ता काढला आहे. त्या रस्त्याला 180 अंशातून वळवण्यात आला आहे. त्यामुळे येथे मोटार सायकल सुद्धा वळण घेताना अनियंत्रित होते. चार चाकी आणि त्यापेक्षा मोठी वाहने येथे आल्यानंतर कसरत करून पुढे जात असतात. याच ठिकाणी उड्डाणपूल असल्याने पुलाच्या खालून येणाऱ्या वाहनांची सुरक्षितता सुद्धा धोकादायक झाली आहे.
बाजीराव विहीर येथील उड्डाण पुलाखालुन ऊस वाहतुकीस अडचण होणार !
पालखी मार्गाचे काम सद्या वेगात चालु आहेत. माञ पालखी मार्गावरील जे उड्डाण पुल आहेत ते कमी उंचीचे असल्यामुळे ऊस वाहतुकीसाठी मोठे अडचणीचे होणार आहे. बाजीराव विहीरीजवळील उड्डाण पुलाखालुन दक्षिण ऊत्तर दिशेकडुन येणारी ऊसाची वाहने पुर्वेकडील व पश्चीमेकडील ऊस कारखान्याला ऊस न्यायचा असेल तर आताच्या ऊड्डाण पुलाखालुन ऊस भरलेला ट्रॅक्टर जाईल असे दिसत नाही . जर ऊड्डाण पुलाच्या बाजुच्या पर्यायी रस्त्यावरुन जायचे असेल ऊसाने भरलेला ट्रॅक्टर मुख्य रस्ता क्राॅस कसा करणार असाही प्रश्न निर्माण होत आहे.
खेडभाळवणी – गादेगाव या मार्गावर उड्डाणपूलाखाली गतिरोधक नाहीत, त्यामुळे वाहने वेगात येतात आणि इथेच हे धोकादायक वळण असल्याने अपघाताची शक्यता बळावते आहे. आज झालेल्या अपघातात कुणीही जखमी झाले नसले तरी भविष्यात यापेक्षा मोठी दुर्घटना घडू शकते हेच यातून दिसून आले आहे.