खळवे येथील टकरीत भंडीशेगाव च्या रेड्याचा मृत्यू

पटवर्धन कुरोलीच्या रेड्यासोबत होती टक्कर : आयोजकांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी

पंढरपूर : ईगल आय मीडिया

खळवे ( ता.माळशिरस ) येथे आज दिवाळीनिमित्त झालेल्या रेड्याच्या टकरीमध्ये एका रेड्याचा मृत्यू झाला आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली असून टकरीचे आयोजन करण्यांवर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी करण्यात येत आहे. 

  याबाबत सविस्तर माहिती अशी की, खळवे, ( ता. माळशिरस ) येथे दिवाळीनिमित्त म्हसोबा मंदिर पटांगणात रेड्याच्या टकरी भरविण्यात आल्या होत्या. आज (रविवार, दि. ०७ नोव्हेंबर रोजी ) सकाळी ०९ वाजल्याच्या दरम्यान टकरी सुरू झाल्या.  यामध्ये भंडीशेगाव ( ता.पंढरपूर ) व पटवर्धन कुरोली ( ता.पंढरपूर ) येथील दोन रेड्यामध्ये अश्या टकरी लावण्यात आल्या होत्या.  टकरी सुरु झाल्यानंतर यातील भंडीशेगाव येथील रेडा रस्त्याने तीन ते चार किलोमीटर पळत जाऊन मरण पावला आहे. 

    गावचे सरपंच, तंटामुक्त अध्यक्ष, ग्रामसेवक यांना निलंबित करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अन्यथा आम्ही मोठे आंदोलन उभा करणार आहे.

भगवान शिवाजी पाटील, ग्रामस्थ, खळवे

       दरम्यान, प्रशासनाचे नियम पायदळी तुडवून टकरी आयोजित करून पशुहत्येसाठी जबाबदार ठरलेल्या आयोजकांवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे. विशेष म्हणजे या टकरी भरविण्यासाठी गावचे सरपंच, उपसरपंच, तंटामुक्ती अध्यक्ष उपस्थित असल्याची चर्चा गावात सुरू आहे.  सदर प्रकाराबद्दल  ग्रामसेवक सतीश गीते यांना संपर्क केला असता त्यांनी उत्तर दिले की सदर रेड्याच्या टकरी विषय मला कोणतीही अधिकृत माहिती नाही

One thought on “खळवे येथील टकरीत भंडीशेगाव च्या रेड्याचा मृत्यू

  1. बातमी जरा देतानी योग्य माहीती घेऊन देत जावा भंडीशेगाव चा रेडा मेला आहे

Leave a Reply

error: Content is protected !!