मा आ दत्तात्रय सावंत यांची माहिती
पंढरपूर : ईगल आय मीडिया
राज्यातील २०वर्षांपासून विना वेतन काम करणाऱ्या शिक्षकांना २०टक्के व पाच पासून फक्त २०टक्के अनुदानावर असलेल्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना पुढील टप्पा अनुदान देण्यासाठी ४०४ कोटी निधीची आवश्यकता होती सदर खर्च चालू आर्थिक वर्षाच्या अनुदानातून देने शक्य असल्याने त्यासाठी लाक्षणिक पुरवणी मागणी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सादर झाली असल्याची माहिती माजी आ. दत्तात्रय सावंत यांनी दिली.
२०१२-१३च्या नैसर्गिक वाढीच्या तुकड्या तसेच किरकोळ त्रुटीमुळे अद्याप पात्र घोषित न झालेल्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा, शाखा, तुकड्या घोषित करून त्यांनाही अनुदान देने गरजेचे होते, त्यांच्या याद्या अनुदानासह घोषित करण्यात याव्यात यासाठी पाठपुरावा सुरू आहे. :- विकास शिंदे
सचिव, शाळा कृती समिती सोलापूर
सातत्याने तपासण्याहून होऊन ही अनुदान मिळत नसल्याने शिक्षकांमध्ये असंतोष निर्माण झाला होता, राज्यातील ४१३१ प्राथमिक शाळा व तुकड्यांवरील शिक्षक तसेच १७२९९माध्यमिक शाळा, तुकड्यांवरील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना वाढीव २०टक्के अनुदान देण्यासाठी २६३कोटी निधीची आवश्यकता होती. सदर खर्च चालू आर्थिक वर्षाच्या अनुदानातून भागविणे शक्य असल्याने त्यासाठी तीन हजार रुपये ची लक्षणीय तरतूद पुरवणी मागणीव्दारे करण्यात आली
नोव्हेंबर महिन्यापासून मिळणार पगार !
राज्यातील २१४३० शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना एक नोव्हेंबर पासून वाढीव २०टक्के तर १०४८८ शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना एक नोव्हेंबर पासून २०टक्के प्रमाणे वेतन मिळणार आहे.त्यासाठी लवकरच शासन आदेश निर्गमित होईल अशी माहिती मा आ दत्तात्रय सावंत यांनी दिली.
प्राथमिक शाळेतील १६८८ शिक्षकांना २०टक्के प्रमाणे अनुदान देण्यासाठी २०कोटी निधी आवशकता होती, तर उच्च माध्यमिक शाळेतील ८८२० शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी २०टक्के प्रमाणे अनुदान देण्यासाठी १२०कोटींची आवश्यकता होती सदर खर्च चालू आर्थिक वर्षाच्या अनुदानातून देने शक्य असल्याने त्यासाठी एक हजार रुपये ची लाक्षणिक तरतूद पुरवणी मागणी व्दारे करण्यात आली आहे.