मंदिरे, जिम, लोकल रेल्वे बंदच राहणार

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची स्पष्टोक्ती

टीम : ईगल आय मीडिया

जबाबदारी तुमच्यावर नाही आमच्यावर आहे, त्यापेक्षाही जनतेवर आमचं प्रेम आहे. तगडयात तगड घालून मंदिर बंद ठेवायची आमची इच्छा नाही. उघडलेल्या दरातून समृद्धी आली पाहिजे करोना नको” असं म्हणून उद्धव ठाकरे यांनी मंदिरे खुली करण्याची शक्यता तूर्तास तरी फेटाळली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दुपारी राज्यातील जनतेला संबोधित केले. मागच्या काही महिन्यांपासून लोकल, मंदिर आणि जीम सुरु करण्याची मागणी सातत्याने होत आहे. मात्र मुख्यमंत्री ठाकरे यांच्या या वक्तव्यावरून लोकल, मंदिर आणि जीम इतक्यात सुरु होणार नाही हे स्पष्ट झालं आहे.

मुंबईत इतक्यात तरी लोकल पूर्ण क्षमतेने सुरु होणार नाही. राज्यातंर्गत ट्रेन वाहतूक सुरु केल्याचं सांगून लोकलची संख्या वाढवण्याची मागणी केली आहे. ती मागणी मान्य झाल्यानंतर आणखी काही लोकांना लोकल प्रवासाची परवानगी देऊ असंही सांगितलं.


जीम सुरु करण्याची मागणी होत आहे, त्याबद्दल लवकर नियमावली आखून देऊ , जीममध्ये व्यायाम करताना, हार्टच पम्पिंग रेट जास्त असतो. त्यामुळे श्वासोश्वास वाढतो आणि त्यातून करोनाचा प्रसार होऊ शकतो असं ठाकरे म्हणाले.

Leave a Reply

error: Content is protected !!