नालासोपाऱ्यात ऑक्सिजन अभावी 10 रुग्णांचा मृत्यू

टीम : ईगल आय मीडिया

नालासोपाऱ्यात धक्कादायक घटना समोर आली आहे. ऑक्सिजन न मिळाल्यामुळे तब्बल सात रुग्णांचा तासाभरात मृत्यू झाला आहे. नालासोपाऱ्यातील विनायक हॉस्पिटलमध्ये हा संपूर्ण प्रकार घडला आहे. मृतांच्या नातेवाईकांनी या घटनेप्रकरणी संताप व्यक्त करत रुग्णालयात गोंधळ घातला. या घटनेमुळे संपूर्ण नालासोपाऱ्यात खळबळ उडाली आहे.

नालासोपाऱ्यात आज तब्बल 10 रुग्णांचा ऑक्सिजन न मिळाल्याने मृत्यू झाला. यापैकी सात रुग्ण हे विनायक तर तीन रुग्ण हे रिद्धीविनायक हॉस्पिटलमध्ये मृत्यूमुखी पडले. या दोन्ही हॉस्पिटलमध्ये सोमवारी संध्याकाळच्या सुमारास ऑक्सिजनचा साठा संपला होता. परिणामी एक तासात तब्बल 10 रुग्णांचा मृत्यू झाला.

दरम्यान, हॉस्पिटल प्रशासनाने हे सर्व रुग्ण अत्यवस्थ होते. त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला, असा दावा केला आहे. राज्य सरकारने या अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी तातडीने महत्त्वपूर्ण पावलं उचलणं जास्त जरुरीचं आहे.


दरम्यान, ठाण्यात रविवारी (11 जानेवारी) ऑक्सिजनचा साठा संपल्याने तब्बल 26 रुग्णांना पार्किंग प्लाझा कोव्हिड सेंटरमधून ग्लोबल हॉस्पिटलला हलवण्यात आलं होतं.

Leave a Reply

error: Content is protected !!