इ.10 वी आणि 12 वीच्या संभाव्य तारखा या असतील

शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली माहिती

टीम : ईगल आय मीडिया

राज्य शिक्षण मंडळाच्या इयत्ता बारावी परीक्षा १५ एप्रिलनंतर तर इयत्ता दहावीची परीक्षा ३ मेनंतर घेण्याचे प्रयत्न करण्यात येत असल्याची माहिती, शालेय शिक्षणमंत्री वर्षां गायकवाड यांनी रविवारी दिली.

करोनामुळे कोलमडलेले शैक्षणिक वर्ष सुरळीत करण्याचे प्रयत्न शिक्षण विभागातर्फे सुरू आहेत. ऑनलाइन वर्गावर भिस्त ठेवून आता परीक्षांची तयारी विभागाने सुरू केली आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल यांनी केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या परीक्षांच्या तारखा नुकत्याच जाहीर केल्या.

त्यानंतर आता राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाच्या परीक्षा कधी होणार याबाबत विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता आहे. गायकवाड यांनी परीक्षांच्या साधारण तारखा जाहीर केल्या आहेत. त्याच्या वेळापत्रकात बदल ही होऊ शकतो. मात्र अंदाजे त बारावीची लेखी परीक्षा १५ एप्रिलनंतर तर दहावीची परीक्षा ३ मेनंतर घेण्याचे नियोजन शिक्षण विभागामार्फत करण्यात येत आहे.


सध्या मुंबई, ठाणे वगळून राज्यातील बहुतेक ठिकाणी नववी ते बारावीचे वर्ग सुरू झाले आहेत. त्यानुसार आता पाचवी ते आठवीपर्यंत शाळा सुरू करण्यासंदर्भात आणखी काही दिवस परिस्थितीचा आढावा घेऊन याबाबतचा निर्णय घेण्यात येईल. राज्यातील करोना प्रादुर्भावाची स्थिती लक्षात घेऊन आणि सार्वजनिक आरोग्य विभागाशी चर्चा करून शाळा सुरू करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

Leave a Reply

error: Content is protected !!