बर्निंग बस : st बस जळून खाक

पुणे-बंगळुरू महामार्गावरील घटना

टीम : ईगल आय मीडिया

पुणे – बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर काल (रविवारी) रात्री साडेनऊ वाजता आनेवाडी टोलनाक्या जवळ चालत्या एसटी बसने अचानक पेट घेतला आणि बस जळून खाक झाली. या घटनेने खळबळ उडाली.

प्राथमिक माहितीनुसार साताऱ्याहून पुणे कडे जाणारी एसटी बस उडतारे गावच्या हद्दीत असताना अचानक वाहनातून धूर येऊ लागल्याने चालकाने एसटी बाजूला घेतली. त्यानंतर फक्त काही  मिनिटांत संपूर्ण  एसटी बसने पेट घेतला. st बस पेटली असून घटनेत कोणीही जखमी अथवा जीवितहानी झाली नाही.

ही आग एवढी भीषण होती की एसटी जळून भस्मसात झाली. या सर्व घटनेमुळे वाहतूक काही काळ ठप्प झाली. या घटनेत जीवित हानी झालेली मात्र एसटी मधील प्रवासी सुखरूप आहेत.भुईंज पोलीस ठाण्यात घटनेची नोंद झाली आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!