…तर राज्यात पुन्हा लॉकडाऊन !

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे सूचक वक्तव्य

टीम : ईगल आय मीडिया

कोरोनाच्या ओमीक्रोन विषाणूचा राज्यात प्रादुर्भाव वाढू लागला आहे, जर कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढून 500 मे टन ऑक्सिजन ची गरज भासू लागली तर राज्यात पुन्हा लॉक डाऊन लागू केले जाईल असे सूचक वक्तव्य आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले आहे.

करोनाच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्यामुळे राज्यात नुकतेच काही निर्बंध लागू करणार आहेत. ही परिस्थिती कायम राहिल्यास आगामी काळात पुन्हा लॉकडाऊन लागण्याची शक्यता आहे. मात्र, ही वेळ नक्की कधी येईल, हा प्रश्न अनेकांना भेडसावत आहे.

आरोग्यमंत्री राजेश टोपे  यांनी एक महत्त्वाचे स्पष्टीकरण दिले आहे. यापूर्वीचा अनुभव पाहता राज्यात जेव्हा दररोज करोना रुग्णांसाठी ८०० मेट्रिक टनची गरज लागेल, तेव्हा लॉकडाऊन लावायचा, हे धोरण ठरले आहे. पण ओमायक्रॉनच्या संसर्गाच वेग हा प्रचंड आहे. त्यामुळे ऑक्सिजन वापराची मर्यादेचे निकष ५०० मॅट्रिक टनापर्यंत खाली आणण्याविषयी विचार सुरु आहे.

त्यामुळे भविष्यात दररोज ५०० मॅट्रिक टन ऑक्सिजनची गरज भासू लागल्यास महाराष्ट्रात संपूर्ण लॉकडाऊन लागू होईल, अशी शक्यता मंत्री राजेश टोपे यांनी वर्तविली.

Leave a Reply

error: Content is protected !!