टास्क फोर्सने दिला ईशारा : लहान मुलांना बाधा होण्याचा धोका कमी
टीम : ईगल आय मीडिया
महाराष्ट्रातील कोविड 19 वरील टास्क फोर्सने कोरोना साथीच्या तिसर्या लाटेसंदर्भात ईशारा दिला असून येत्या दोन ते चार आठवड्यांत महाराष्ट्रात कोरोनाची तिसरी लाट येऊ शकते असे म्हटले आहे. काल मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत हा ईशारा देण्यात आला आहे. या बैठकीला टास्क फोर्सचे सदस्य, आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
टास्क फोर्सने सांगितले की, गेल्या तीन दिवसांपासून ज्या प्रकारे राज्यात गर्दी होत आहे, कोरोना नियमांचे उल्लंघन केले जात आहे, हे त्याचे लक्षण आहे. टास्क फोर्सने पुढे म्हटले आहे की, तिसऱ्या संभाव्य लाटेत मुलांना विषाणूचा फारसा त्रास होणार नाही, आतापर्यंत राज्यात अल्पवयीन मुले या विषाणूंपासून वाचलेले आहेत. हे अंदाज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी झालेल्या बैठकीत हे व्यक्त झाले.
बैठकीत दर्शविलेल्या आकडेवारीनुसार कोरोना विषाणूच्या तिसऱ्या लाटेत संसर्ग होण्याची संभाव्य संख्या दुसर्या लाटेत नोंदविलेल्या संख्येच्या दुप्पट असू शकते. दुसर्या लाटेदरम्यान, राज्यात एकाच वेळी संसर्गाची सक्रीय रुग्णांची संख्या आठ लाखांच्या पुढे गेली होती.
बुधवारी राज्यात १.4 लाख सक्रिय प्रकरणे नोंदविण्यात आली. यासह या बैठकीत सांगण्यात आले की, कोरोनाच्या पहिल्या लहरीमध्ये 19 लाख प्रकरणे नोंदविण्यात आली आहेत. त्याच वेळी, दुसर्या लाटेत ही संख्या 40 लाखांवर गेली. कोरोनाच्या तिसर्या लाटेमध्ये पहिल्या दोन लाटांप्रमाणेच केवळ 10 टक्के मुले आणि तरुण प्रौढ लोकांवर कोविड चा परिणाम होईल असाही अंदाज यावेळी व्यक्त करण्यात आला.