‘त्या’ अपघातातील तिसऱ्या युवकाचाही मृत्यू

एस. एम. अवताडे कन्स्ट्रक्शन कंपनीच्या टिपरला मोटारसायकल ची धडक

माळशिरस : ईगल आय मीडिया

वेळापूर (ता.माळशिरस ) येथील अपघातातील जखमी युवकाचा मृत्यू झाला असून या अपघातातील मृतांची संख्या 3 झाली आहे. धनाजी संजय जाधव असे तिसऱ्या मयत युवकाचे नाव आहे.

व्हीडिओ पहा आणि चॅनेल subscribe करा

वेळापूर येथे उघडेवाडी चौकात एस एम अवताडे कन्स्ट्रक्शन कंपनीच्या टिपरला मोटारसायकल धडकून झालेल्या अपघातात 2 युवक ठार झाले आहेत.त्याच अपघातात 1 युवक गंभीर जखमी झाला होता.

त्याला अकलूज येथे खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. तेथे उपचारा दरम्यान जखमी युवकाचे निधन झाले आहे. त्यामुळे या अपघातातील मयतांची संख्या 3 झाली आहे. या प्रकरणात अद्यापही पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला नाही.

Leave a Reply

error: Content is protected !!