पंढरपूर तालुक्यातील कोरोना बाधितांची संख्या 550 च्या उंबरठ्यावर
पंढरपूर : ईगल आय मीडिया
पंढरपूर शहरात आज 27 तर ग्रामीण भागात 8 रुग्ण पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत, ग्रामीण भागात कोर्टी, कासेगाव, शिरगाव, मुंढेवाडी, आढिव या गावात नवीन रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे शहर व तालुक्यातील एकून रुग्ण संख्या 548 इतकी झाली झाली आहे.
शुक्रवारी पंढरपूर शहरातील एकूम 64 अहवाल प्राप्त झाले आहेत, त्यापैकी 29 अहवाल निगेटिव्ह तर 35 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आहेत. यामध्ये संत गजानन महाराज मठ, उपजिल्हा रुग्णालय येथे केलेल्या रॅपिड अँटीजन तपासणीत 12 अहवाल पॉझिटिव्ह आले तर सोलापूर येथे swab तपासणीचे 18 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यापूर्वी शहर व तालुक्यातील 513 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत आणि एकूण पॉझिटिव्ह रुग्ण संख्या 548 एवढी झाली आहे.
शनीवारी प्राप्त अहवालानुसार
शहरात नवीन 27 ग्रामीण भागात 8 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. तर शहरातील भाई भाई चौक, डाळे गल्ली,माळी वस्ती, सिद्धिविनायक नगर,झेंडे गल्ली,सारडा भवन, संत पेठ, सांगोला रोड, भुयाचा मारुती जबल, कुंभार गल्ली, लक्ष्मी नगर,जगदंबा नगर, घोंगडे गल्ली, इसबावी, गोविंदपुरा, उजनी कॉलनी, उत्पात गल्ली, विजापूर गल्ली या भागात हे नवीन रुग्ण आढळून आले आहेत.