सुदैवाने एकही मृत्यू नोंद नाही

पंढरपूर : ईगल आय मीडिया
पंढरपूर तालुक्यात आजवरचा सर्वात मोठी पॉझिटिव्ह रुग्ण संख्या समोर आली असून मागील 24 तासात 333 लोकांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत.
समाधानाची बाब अशी की, गेल्या 24 तासात एकही कोरोना बाधित मृत्यूची नोंद झालेली नाही. पंढरपूर तालुक्यात रविवारी आलेल्या अहवालात ( 25 एप्रिल ) रोजी 333 रुग्ण आढळले आहेत.
शहरात 92 तर ग्रामीण भागात 241 रुग्ण वाढले आहेत. मात्र काल दिवसभरात एकही रुग्ण कोरोनामुळे दगावला नाही. जिल्ह्यातील अन्य तालुक्याच्या तुलनेत पंढरपूर तालुक्यातील मृत्यूचे प्रमाण कमी असल्याचे दिलासादायक चित्र दिसत आहे.