पंढरपूर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्णांचे शतक,
शहर व तालुक्यातील बाधितांची संख्या 118
पंढरपूर : ईगल आय मीडिया
बुधवारी रॅपिड अँटीजन टेस्ट मध्ये 29 लोकांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे पंढरपूर शहर व तालुक्यातील एकूण कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 118 इतकी झाली आहे. गुरुवारी एकाच दिवसात 30 पॉझिटिव्ह रुग्ण वाढले आहेत. विशेष म्हणजे रॅपिड अँटीजन टेस्टमध्ये पंढरपूर मधील एका पत्रकाराचाही समावेश आहे.
दरम्यान गुरुवारी उपचार घेऊन बरे झालेल्या 10 लोकांना घरी सोडण्यात आले.
पंढरपूर शहर व तालुक्यातील कोरोना रोगाचा प्रसार वेगाने वाढत आहे. बुधवारी 24 पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्यानंतर, गुरुवारी 30 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. पंढरपूर ग्रामीण मधील 28 पॉझिटिव्ह रुग्ण आहेत तर पंढरपूर शहरातील 82 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत.
गुरुवारी पंढरपूर शहरातील व्यास नारायण झोपडपट्टी, ज्ञानेश्वर नगर झोपडपट्टी, रोहिदास चौक, घोंगडे गल्ली, महापूर चाळ, गोविंदपुरा, उमदे गल्ली, अंबाबाई पटांगण जुनी पेठ, इसबावी या भागातील तसेच ग्रामीण भागातील कान्हापुरी एकलासपूर येथील लोक पॉझिटिव्ह आले आहेत.
यापैकी उपजिल्हा रुग्णालय येतील केअर सेंटर येथे 16 लोकांवर उपचार सुरू आहेत, तर एम आय टी covid-19 सेंटर येथे 54 लोकांवर उपचार सुरू आहेत. गुरुवारी दहा लोकांना बरे झालेले घरी सोडण्यात आले आहे अशी माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ एकनाथ बोधले यांनी दिली.