चंद्रभागा नदीत टिपर पडला : चालक ठार

पंढरपुर : ईगल आय मीडिया

पंढरपुर शहरातून निघालेला टिपर पुलाचा कठडा तोडून चंद्रभागा नदीत कोसळला आहे. या अपघातात चालकाचा पाण्यात बुडवून मृत्यू झाला असून त्याचे नाव अद्याप समजू शकलेले नाही.

आज सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास शहरातून निघालेला टिपर क्र.( Mh-12, fc-7633) नदीवरील कठडा आणि लोखंडी पाईप तोडून नदीत कोसळला. या अपघातात टिपरचा चालक पाण्यात बुडुन ठार झाला आहे. व्यंकट अनंत माने ( वय अंदाजे वय वर्ष 35 ) असे मयत चालकाचे नाव असल्याचे समजते.

अपघाताचे वृत्त समजताच शहर आणि तालुका पोलीस ठाण्याचे पोलिस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी टिपर चालकाचा मृतदेह बाहेर काढला आहे. पुढील कार्यवाही सुरू आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!