अपघातग्रस्त टिपर मयत तुषार जाधव मयत देवा माने
माळशिरस : ईगल आय मीडिया
वेळापूर ( ता.माळशिरस ) येथे एस. एम. अवताडे कन्स्ट्रक्शन कंपनीच्या टिपर ( क्र. Mh 13, cu 9884 ) ला धडकून 2 युवकांचा जागीच मृत्यू झाला आहे तर 1 जण जखमी झाला आहे.
तुषार शहाजी जाधव ( वय 16 रा. वेळापूर ) याचा जागेवर मृत्यु झाला तर देवा बाबासाहेब माने ( वय 25 रा. वेळापूर ) उपचारा दरम्यान मृत्यू झाला असून धनाजी संजय जाधव ( रा. तोंडले वय 16 ) गंभीर जखमी झाला आहे. उघडेवाडी चौक येथे पालखी मार्गावर पाठीमागून आलेल्या टिपर खाली गेले.
संबंधित पोलीस कर्मचारी यांनी जास्त पाठलाग केल्याने
मोटर सायकल वरील तरुणाचा मृत्यू झाला असल्याचा आरोप. मात्र या कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल केला जात नाही, तोपर्यंत प्रेत ताब्यात घेतले जाणार नाही असा ईशारा देेणार्या नातेवाईकांनी पोलीस ठाण्यात हंबरडा फोडला आहे. दरम्यान, डी.वाय.एस.पी. नीरज राजगुरू घटनास्थळी व पोलीस ठाण्यात दाखल झाले आहेत.
पालखी चौक येथून पोलीस कर्मचारी यांनी पाठलाग केला पोलिसांच्या कारवाईच्या भीतीने वेगाने निघालेल्या युवकांची मोटार सायकल पाठीमागून येणाऱ्या टिपर ला धडकली. यामध्ये 2 जण ठार झाले तर एक जण जखमी झाला आहे. मृतांच्या नातेवाईकांनी वेळापूर पोलीस ठाण्यात गर्दी करून टिपर चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
पंढरपूर – पुणे पालखी महामार्गाचे काम सुरू असून एस. एम. अवताडे कंपनीचे टिपर या मार्गावर वाहतूक करीत आहेत. या दरम्यान वेळापूर येथील चौकातून पंढरपूर कडे निघालेल्या दुचाकीची उघडेवाडी चौकात वेळापूरकडे येणाऱ्या टिपरला धडक बसली. यामध्ये दोन युवकांचा जागीच मृत्यू झाला आहे. या अपघाताची अद्याप वेळापूर पोलीस ठाण्यात नोंद झालेली नाही.
वाहन चालक सावकाश