लाभक्षेत्रातील 10 गावच्या शेतकऱ्यांतून समाधान
पंढरपूर : ईगल आय मीडिया
दरवर्षी 15 ऑक्टोबरपर्यंत संघर्ष करून भरला जाणारा, पश्चिम भागातील दहा गावांसाठी उपयुक्त असलेला तिसंगी तलाव यंदा मात्र 16 जुलै रोजी शंभर टक्के भरला आहे. नियोजन व तरतुदीनुसार दरवर्षी दर वर्षी 15 ऑक्टोबर पर्यंत हा तलाव भरला जातो परंतु यंदा समाधानकारक पावसामुळे त्याला तब्बल तीन महिने अगोदर तलाव भरल्यामुळे शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे.
तिसंगी तलावाची पाणी साठवण क्षमता सुमारे एक टीएमसी इतकी आहे. तर
या तलावावर सोनके, गादेगाव, उपरी, भंडीशेगाव, वाखरी, खेडभाळवणी, शेळवे, पळशी आदि गावातील 2000 हेक्टरहुन जास्त सिंचन क्षेत्र आहे. नीरा – उजवा कालव्यातून वीर, भाटघर धरणातील पाणी या तलावात सोडण्यात येते. दर वर्षी हा तलाव भरून घेतला जात असतो, मात्र यंदा नीरा – उजवा कालव्याच्या लाभक्षेत्रातील समाधानकारक पावसामुळे पाण्याची मागणी झाली नाही. त्यामुळे नीरा – उजवा कालव्यातून सुमारे साडेचारशे क्यूसेक्स प्रमाणे तलावात पाणी सोडण्यात आले.
यंदा तलावात अगोदरच आठ फूट पाणी शिल्लक होते. त्यामुळे तलाव सुमारे पंचवीस दिवसातच 100% भरण्यात आलेला आहे. यावर्षी तिसंगी तलावातून पाण्याच्या तीन पाळ्या सोडण्यात आल्यामुळे लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना त्याचा चांगला फायदा झाला आहे. त्याचप्रमाणे यंदाही तलाव शंभर टक्के भरल्यामुळे पुढच्या वर्षभरातील शेतीच्या पाण्याचा प्रश्न सुटल्यामुळे शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे.
पहा खास रिपोर्ट, live तिसंगी तलावावरून
आणि चॅनेल subscribe करा
🔔🔔 दाबा