दिलासादायक : पंढरपूर तालुक्यातील आजचा कोरोना अहवाल

आजचा पंढरपूर चा कोरोना अहवाल पाहून सुखावून जाल !

पंढरपूर : ईगल आय मीडिया

गेल्या दीड वर्षापासून कोरोना महामारी मुळे ट्रस्ट झालेल्या पंढरपूर कराना आज मोठाच दिलासा मिळाला असून आजच्या अहवालातील कोरोना रुग्णांची संख्या दिलासादायक आहे. आजच्या अहवालात केवळ 8 रुग्ण पॉझिटिव्ह असून गेल्या काही महिन्यातील ही सर्वात कमी रुग्ण संख्या आहे.

आज सोलापूर जिल्ह्यात एकूण 74 नवीन रुग्ण सापडले आहेत आणि त्यात 5 जनांचा मृत्यू आहे. विशेष म्हणजे 3 तालुक्यातील कोरोना रुग्ण संख्या शून्य आहे. तर 5 तालुक्यात 1 अंकी रुग्ण सापडले आहेत.

पंढरपूर तालुका हा कोरोना महामारी मुळे मोठ्या प्रमाणात प्रभावित झाला असून आजवर दुसऱ्या लाटेत 33 हजार 882 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत तर 634 जनांचा बळी कोरोना ने घेतला आहे. या पार्श्वभूमीवर आजच्या अहवालातील केवळ 8 रुग्ण संख्या खूपच समाधानकारक आणि कोरोना ची दुसरी लाट ओसरली असल्याचे सिद्ध करणारा आहे.

यामध्ये ग्रामीण भागातील 7 आणि शहरातील केवळ 1 रुग्णांचा समावेश आहे. विशेष म्हणजे उद्या पासून ( दि.4 पासून ) तालुक्यातील शाळा,महाविद्यालये सुरू होत आहेत. पुढील आठवड्यात सर्वच मंदिरे खुली होणार आहेत. या पार्श्वभूमीवर आलेल्या ताज्या आकडेवारी नुसार मोठा दिलासा मिळाला आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!