अति जोखमीच्या लोकांना संस्था क्वारंटाईन व्हावे लागणार
पंढरपूर : ईगल आय मीडिया
पंढरपूर शहरात सापडलेल्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आलेल्या लोकांचा शोध घेण्याची प्रक्रिया सुरू असून आतापर्यंत एकूण 145 लोक त्यांच्या संपर्कात आलेले आहेत.
त्यामध्ये शाळा, बँक आणि इतर ठिकाणी सम्पर्क आलेल्या लोकांचा समावेश आहे..
सदरची व्यक्ती एका सहकारी बँकेत संचालक असून 24 जून रोजी झालेल्या बँकेच्या संचालक मंडळाच्या मीटिंगमध्ये ही व्यक्ती सहभागी होती. त्यामुळे बँकेतील 12 लोक जास्त जोखमीचे तर
13 लोक कमी जोखमीचे यानुसार संपर्कात आलेले आहेत.
सदरची व्यक्ती ज्या शाळेत शिक्षक आहे त्या शाळेत
जास्त जोखीम असलेले 14 तर कमी जोखीम असलेले बँक 66 लोक संपर्कात आल्याची प्राथमिक माहिती आहे. यामध्ये ज्या विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप केले आहे अशा विद्यार्थ्यांचा समावेश आहे. हे विद्यार्थी कमी जोखिम असलेले आहेत अशी माहिती समजते. शाळेत एकूण 80 जणांच्या संपर्कात ही व्यक्ती आलेली होती. त्याशिवाय इतरही ठिकाणी संपर्कात आलेल्या लोकांची संख्या जास्त जोखीम 15 तर कमी जोखीम 25 या प्रमाणे आहेत. आणखी संपर्कात आलेल्या लोकांची माहिती काढण्यात येत आहे अशी माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली.
पंढरीत कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या लोकांची संख्या खालील प्रमाणे आहे
बँक – जास्त जोखमीचे 12, कमी जोखमीचे 13 एकूण 25,
शाळा – जास्त जोखमीचे 14, कमी जोखमीचे 66 असे एकूण 80
तर गर्दीच्या आणि इतर ठिकाणी सम्पर्क झालेल्यामध्ये जास्त जोखमीचे 25 तर कमी जोखमीचे 15 असे एकूण 40 लोक आहेत.
आणखी ट्रेसिंग सुरू असून अशा प्रकारच्या संपर्कात आलेल्या लोकांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.
: संपर्कात आलेल्या सर्वांना क्वारंटाईन केले जाणार
शहरातील कोरोना बाधित व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या अति जोखमीच्या व्यक्तींचे swab तपासणीसाठी घेतले जाणार आहेत, त्याच बरोबर कमी जोखमीच्या लोकांना होम क्वारंटाईन तर अति जोखमीच्या लोकांना संस्था क्वारंटाईन केले जाणार आहे. या लोकांना पंढरपूर शहरातच क्वारंटाईन केले जाण्याची शक्यता आहे.