ट्रॅक्टर – ट्रक अपघात : 1 ठार, जखमी

रोपळे ( ता.पंढरपूर ) येथील अपघात

पंढरपूर : ईगल आय मीडिया

पंढरपूर हून कुर्डूवाडीकडे निघालेला उसाचा ट्रॅक्टर आणि कुर्डुवाडी कडून पंढरपूरकडे भरधाव वेगाने निघालेले ट्रक यांच्यात रविवारी पहाटे झालेल्या अपघातात ट्रक चालक जागीच ठार झाला तर अन्य एकजण गंभीर जखमी झाला आहे.

अपघातग्रस्त ट्रँक्टर ( नं.MH 13 DE 4924 ) हा पंढरपूरकडुन धाराशीवकडे जात होता. तर माल ट्रक ( नं.MH 27 BX 1083) चा
चालक मयत दौलतराव घाडगे ( रा.अंबाजोगाई जि बीड ) हा
ट्रक घेेेऊन बीडवरून पंढरपूरकडे येत होता.


पंढरपूर तालुक्यातील रोपळे येथे पंढरपूर-कुर्डुवाडी मार्गावर हा अपघात झाला आहे. पेट्रोल पंपा नजीक ऊसाने भरलेला ट्रॅक्टर व ट्रकचा अपघात होऊन ट्रक ड्रायव्हर जागीच ठार झाला. तर आणखी एकजण गंभीर जखमी झाल्याची घटना रविवारी पहाटेच्या सुमारास घडली.

अपघातातील ट्रक कुर्डूवाडी कडून पंढरपूर कडे तर उसाचा ट्रॅक्टर पंढरपूरहून कुर्डूवाडी कडे निघाला होता. हा ट्रॅक्टर पंढरपूर तालुक्यातील खेड भाळवणी येथील असल्याचे समजते.
या भीषण अपघातामध्ये ट्रक व ट्रॅक्टरचे मोठे नुकसान झाले असून अधिकचा तपास पो पोलीस करीत आहेत.

Leave a Reply

error: Content is protected !!