वाहतूक शाखेच्या पोलिसाला टेम्पोने ठोकरले : जागीच झाला मृत्यू

याचटेम्पोने पोलीस कर्मचाऱ्यास ठोकरले आहे.

टीम : ईगल आय मीडिया

वरवडे ( ता.माढा ) येथील टोल नाक्यावर ड्युटीवर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांसभरधाव टेम्पोने ठोकरल्याने पोलीस कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू झाला. पोलीस नाईक सागर औदुंबर चोबे असे मयत पोलीस कर्मचार्यांचे नाव आहे.

सोलापूर – पुणे राष्ट्रीय महामार्गावर वरवडे येथील टोल नाक्यावर टेम्भुर्णी च्या दिशेने निघालेल्या टेम्पोला थांबवण्यासाठी ड्युटीवर असलेल्या पोलीस नाईक चोबे यांनी हात केला होता, यावेळी भरधाव आलेल्या टेम्पोने चोबे यांना ठोकरले. आज ( रविवार ) सायंकाळी साडे पाच वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला आहे.

टेम्पो क्रमांक ( mh 04, hd 0170 ) हा हैदराबाद हुन मुंबईला मेडिसीन घेऊन निघाला होता. टेम्पो चालक आरोपी नवनाथ शिवाजी गुट्टे ( रा.परळी वैजनाथ, जि. बीड ) यास अटक करण्यात आले आहे.

यात चोबे यांचा जागीच मृत्यू झाला. टेम्पो आणि चालकास ताब्यात घेण्यात आले असून सदरचा टेम्पो मेडिसिन घेऊन निघाला होता असे समजते.

Leave a Reply

error: Content is protected !!