दिलीपकुमार यांचं निधन

टीम : ईगल आय मीडिया

ट्रेजेडीकिंग म्हणून ओळख असलेले ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचं निधन झालं आहे. सकाळी ७.३० वाजता हिंदूजा रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. वयाच्या ९८ व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. आज पहाटे त्यांचं निधन झालं.

प्रकृतीच्या कारणास्तव काही दिवसांपूर्वी त्यांना हिंदूजा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. याआधी त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यामुळे रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता. पेशावर मध्ये जन्म झालेल्या दिलीपकुमार यांचं कुटुंब फाळणीच्या वेळी भारतात स्थायिक झालं. हिंदी सिनेमात अजरामर भूमिका करणाऱ्या दिलीपकुमार यांना ट्रेजेडीकिंग म्हणून ओळखले जात होते.

पाच दशकांहून अधिक बॉलिवूड करिअरमध्ये दिलीप कुमार यांनी ‘बाबूल’, ‘दीदार’ ‘आन’ ‘गंगा-जमुना’, ‘मधुमती’, ‘देवदास’ .मुघल-ए-आजम, देवदास, नया दौर, राम और श्याम, कर्मा,वीधाता, सौदागर, मशाल असे अनेक सुपरहिट चित्रपट दिले. १९९८ मध्ये आलेला ‘किला’ हा त्यांचा शेवटचा चित्रपट ठरला.

दिलीप कुमार यांना श्वसनाचा त्रास होत असल्या कारणाने जून महिन्यात रुग्णालयात दाखल करावं लागलं होतं. बायलॅटरल प्लुरल इफ्युजनमुळे त्यांना आयसीयूमध्ये हलवण्यात आलं होतं. यावेळी सायरा बानो यांनी दिलीप कुमार यांचा रुग्णालयातील फोटोदेखील शेअर करत त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती दिली होती. उपचारानंतर पाच दिवसांनी दिलीप कुमार यांना डिस्चार्ज देण्यात आला होता.

सायराबानू यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दिलीप कुमार यांच्यासोबत सावली सारख्या राहणाऱ्या पत्नी सायरा बानो यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. त्या अनेकदा चाहत्यांनाही दिलीप कुमार यांच्यासाठी सतत प्रार्थना करण्याचे आवाहन करायच्या.

दिलीप कुमार यांनी ‘ज्वार भाटा’ या सिनेमातून १९४४ मध्ये सिनेसृष्टीत पदार्पण केलं होतं. सामान्य माणसाच्या आयुष्यातील दुःख दिलीप कुमार यांनी त्यांच्या अभिनयातून उतरवलं आणि पुढची अनेक वर्षे रसिकांच्या मनावर अधिराज्य केले.

One thought on “दिलीपकुमार यांचं निधन

Leave a Reply

error: Content is protected !!