खेळताना पडलेल्या मुलाच्या डोक्याला जखम ; डॉक्टर विरोधात पोलिसात गुन्हा दाखल
टीम : ईगल आय मीडिया
खेळताना पडल्यामुळे मुलाच्या कपाळाला जखम झाली, त्यास रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याच्या जखमेवर टाके घालण्याऐवजी तिथे चक्क फेविक्विक लावलं. पालकांच्या लक्षात हे येताच त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि डॉक्टरच्या करामती विरोधात तक्रार केली. पोलिसांनी लागलीच डॉक्टरविरोधात तक्रार दाखल केली आहे. दरम्यान या घटनेमुळे देशभरात खळबळ उडाली आहे.
कर्नाटकच्या रायचूर जिल्ह्यातील लिंगसोगूरमध्ये राहणारे वंशकृष्ण त्यांची पत्नी सुनीता आणि ७ वर्षीय मुलगा प्रविणला घेऊन तेलंगणातील जोगुलंबा गडवाल जिल्ह्यात असलेल्या एका नातेवाईकाकडे लग्नासाठी गेले होते. त्यावेळी खेळताना प्रवीण पडला आणि त्याच्या कपाळाला इजा झाली तसेच डाव्या डोळ्याच्या वरील भागात दुखापत झाल्यानं रक्तस्राव झाला.
रुग्णालयातील डॉक्टरांनी प्रविणच्या कपाळावर झालेल्या जखमेवर टाके घालण्याऐवजी फेविक्विक टाकून उपचार केले. ही बाब प्रविणच्या वडिलांना समजली. त्यांनी घडलेल्या प्रकाराबद्दल रुग्णालय प्रशासनाकडे तक्रार दाखल केली. यानंतर आरोपी डॉक्टरविरोधात कारवाई करण्यात आली.
प्रवीण यास आइजा येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी नेले असता रुग्णालयातील डॉक्टरांनी मुलाच्या कपाळावरील जखमेला टाके घालण्याऐवजी तिथे फेविक्विक लावलं. डॉक्टरांनी फेविक्विक टाकून उपचार केल्यानं त्याच्या नातेवाईकांनी रुग्णालय परिसरात एकच गोंधळ घातला. खासगी रुग्णालयातील डॉक्टरच्या बेजबाबदारपणाविरोधात पीडित मुलाच्या वडिलांनी पोलीस तक्रार दाखल केली आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
वंशकृष्णनं घडलेल्या प्रकाराची तक्रार आइजा पोलीस ठाण्यात केली. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. आता पोलीस या प्रकरणात काय कारवाई करतात त्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे