राज्य शिक्षण मंडळाचा मंत्रिमंडळास प्रस्ताव
टीम : ईगल आय मीडिया
इयत्ता 10 वीच्या परीक्षा रद्द केल्यानंतर सीबीएसई ने इयत्ता 12 वीच्या परीक्षा रद्द करण्याची घोषणा झाली. त्यापाठोपाठ आता महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकार घेणार असल्याचे संकेत शालेय शिक्षण मंत्र्यांनी दिले आहेत. तसा प्रस्ताव शालेय शिक्षण विभागाने आपत्ती व्यवस्थापन विभागाला पाठवला आहे. अजून त्यावर अंतिम निर्णय झालेला नाही. मात्र दोन दिवसांत असा निर्णय होण्याची शक्यता आहे.
कोरोनाची दुसरी लाट आणि संभाव्य तिसरी लाट लक्षात घेऊन राज्य परीक्षा मंडळाने इयत्ता 10 वीच्या परीक्षा रद्द केल्या आहेत. मात्र बारावीची परीक्षा 23 एप्रिलला होणार होती. केंद्राने सीबीएससीच्या 12 वी च्या परीक्षा रद्द केल्या. यासंदर्भात राज्य सरकारनेही विचारणा केली होती. त्यानुसार मंत्रीमंडळाला इतर राज्यांची माहिती दिली गेली. असून बारावी परीक्षा निर्णयाची फाईल आपत्ती विभागाला सोपवली आहे.
ही एक असाधारण परिस्थिती असल्याने आपत्ती विभाग निर्णय घेईल लवकरच त्यांची बैठक होईल आणि ते निर्णय़ घेतील. त्यानंतर आम्ही बारावी परीक्षा निर्णयाबाबत कळवू. मुलांचं आरोग्य ही आमची प्राथमिकता आहे. केंद्र सरकारसोबत झालेल्या बैठकीत आम्ही जी भूमिका मांडली होती. ती भूमिका आपत्ती व्यवस्थापन विभागाला कळवली आहे. मुंबई हायकोर्टात सरकार बाजू मांडेल. सरकार उद्या होणाऱ्या सुनावणीत बाजू मांडेल, असं शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले आहे.
महाराष्ट्र सरकार बारावीच्या परीक्षा रद्द करण्याच्या बाजूने आहे. या निर्णयाचा 14 लाख विद्यार्थ्यांना फायदा होईल. महाराष्ट्र सरकारनं बारावीच्या परीक्षासंदर्भात केंद्राकडे विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा मुद्दा मांडला होता. त्यावर विचार करुन केंद्रानं सीबीएसईच्या परीक्षा रद्द केल्या.
राज्य सरकारच्या या निर्णयामुळे बारावीच्या 14 लाख विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे. सीबीएसई, आयसीएसई, हरयाणा आणि गुजरात सरकारनं देखील बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. बारावीच्या परीक्षांसदर्भातील परिस्थिती आम्ही मंत्रिमंडळासमोर मांडली आहे. आमचा प्रस्ताव आपत्ती व्यवस्थापन विभागाला कळवला आहे. आपत्ती व्यवस्थापन विभागाची बैठक दोन दिवसांमध्ये होईल. त्यानंतर त्यांची परवानगी आली की आम्ही परीक्षेबाबत निर्णय जाहीर करु, असं वर्षा गायकवाड म्हणाल्या.