नाशिक जिल्ह्यातील 24 भाविक गावी परतल्यानंतर कोरोना पॉझिटिव्ह
टीम : ईगल आय मीडिया
जानोरी ( ता. दिंडोरी,जि. नाशिक )येथील 24 भाविक सायकल रॅली ने पंढरपूरला विठ्ठल दर्शनास आले होते. मात्र गावी परत गेल्यानंतर त्या सर्व 24 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. एवढेच नाही तर त्यांच्या संपर्कात आलेले गावातील, कुटुंबातील इतर 14 जण पॉझिटिव्ह आले आहेत. दरम्यान, या भाविकांना कोरोनाची लागण प्रवासा दरम्यान झाली की, पंढरपूर शहरात गेल्यानंतर झाली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
जानोरी गावात २२ तारखेपर्यंत करोनाचे ३८ रुग्ण होते. गावातील करोना रुग्णांची संख्या वाढू नये म्हणून ग्रामपंचायतीने पत्रक काढलं आहे. तसंच मास्क लावा आणि दोन व्यक्तींमध्ये सोशल डिस्टन्सिंगचं पालन करावं. तसंच घरी गेल्यावर हात साबणाने धुवावेत आणि रुग्ण वाढ होऊ नये याची दक्षता व्यावी, असं आवाहन ग्रामपंचायतीने गावकऱ्यांना केलं आहे.
नाशिक जिल्ह्यातील 24 भाविक सायकल घेऊन पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनाला गेले होते. दर्शनावरून हे भाविक गावी परतल्यावर ते करोना पॉझिटिव्ह आढळून आले. याची माहिती ग्रामपंचायतीने पत्रक काढून दिली. हे सर्व भाविक गावी परतले आहेत. पण ते सर्वच्या सर्व करोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यांच्या इतरांनाही करोनाची लागण झाली आहे. यामुळे गावातील करोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढून ३८ वर गेली आहे.
आणखी काही दिवस कटाक्षणे काळजी घ्यायला हवीय.