टीम : ईगल आय मीडिया
शनिवारी 24 तासात
राज्यात २२ हजार ८४ करोनाबाधित रुग्ण आढळून आले. त्याचबरोबर राज्यातील एकूण करोनाबाधितांची संख्या १०,३७,७६५ वर पोहोचली आहे. तर दिवसभरात ३९१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्याच्या आरोग्य खात्याने ही माहिती दिली आहे.
शनिवारी दिवसभरात २२,०८४ बाधित रुग्ण आढळून आले असले तरी १३,४८९ रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण वाढीच्या तुलनेत रुग्ण बरे होण्याचे आजचे प्रमाण हे ७०.०२ एवढे झाले आहे.
राज्यातील एकूण १०,३७,७६५ करोनाबाधितांपैकी ७,२८,५१२ रुग्ण बरे झाले असून राज्यात सध्या २,७९,७६८ रुग्ण अॅक्टिव्ह आहेत. तसेच आज ३९१ करोनाबाधितांचा मृत्यू झाल्याने मृत्यूदर २.८१ एवढा नोंदवला गेला आहे.