टीम : ईगल आय मीडिया
परंपरेनुसार आज आषाढी यात्रेसाठी पंढरीकडे प्रस्थान ठेवणाऱ्या संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळ्यासमोर अडचणी आल्या आहेत. प्रस्थान सोहळ्यावेळी दर्शनाची परवानगी असणारे 37 वारकरी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.
शासनाच्या नवीन परिपत्रकानुसार प्रस्थानावेळी 350 वारकऱ्यांना दर्शनाची परवानगी शासनाकडून देण्यात आली होती. त्यानुसार आज आणि काल 368 वारकऱ्यांची कोरोना चाचणी केली. त्यापैकी 37 वारकरी पॉझिटिव्ह आले आहेत.
तर प्रस्थान सोहळ्यासाठी 100 वारकऱ्यांना परवानगी देण्यात आली आहे. त्यापैकी 2 वारकरी पॉझिटिव्ह आले आहेत. या 37 जणांच्या संपर्कात आलेल्या वारकऱ्यांचा शोध घेण्यात येईल, हे वारकरी पॉझिटिव्ह आल्याने प्रशासनासमोर मोठा पेच निर्माण झाला आहे.
महाराज मंडळींनी पायी पालखी सोहळ्याची परवानगी मागितली होती मात्र शासनाने दिली नाही. काल संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे प्रस्थान परंपरेनुसार झाले आहे तर आज माऊलींचे प्रस्थान होत आहे.