कालव्यात पडून दोन सख्या भावांचा मृत्यू

टीम : ईगल आय मीडिया

स्वातंत्र्य दिनानिमित्त गोसेखुर्द धरणावर फिरायला आलेल्या दोन सख्ख्या भावांचा सेल्फी काढण्याच्या नादात धरणाच्या कॅनालमध्ये बुडून मृत्यू झाला. सेल्फी काढताना पाय घसरलेल्या एका भावाला वाचवताना दुसऱ्यालाही प्राण गमवावे लागल्याची माहिती आहे.नागपूर हुन 15 ऑगस्ट रोजी पाच मित्र गोसेखुर्द धरणावर फिरायला आले होते. त्यावेळी ही दुर्घटना घडली.

मंगेश मधुकर जुनघरे (37 वर्ष) आणि विनोद मधुकर जुनघरे (35 वर्ष) अशी या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या भावांची नावं आहेत. दोघेही नागपूर जिल्हातील उमरेड येथील रहिवासी होते. गोसेखुर्द धरणावर मंगेश जुनघरे सेल्फी काढत असताना त्याचा तोल गेला आणि तो पाण्यात पडला. त्याला वाचवण्यासाठी त्याचा धाकटा भाऊ विनोद जुनघरे यानेही पाण्यात उडी घेतली.

मात्र पोहता येत नसल्याने दोघांचाही पाण्यात बुडून मृत्यू झाला. स्थानिक मच्छिमारांना बोलावून शोधकार्य केले, एकाच घरातील दोन सख्ख्या भावांचा एकाच वेळी दुर्दैवी मृत्यू झाल्यानं उमरेडमध्ये शोककळा पसरली आहे.

दरम्यान, चिखलदऱ्यातील जत्रा डोहात बुडून दोन युवकांचा मृत्यू
अमरावती जिल्हातल्या चिखलदरा पर्यटन स्थळावर फिरायला आलेल्या अकोला येथील दोन पर्यटक युवकांचा डोहात बुडून मृत्यू झाला. 15 ऑगस्ट रविवारी दुपारी ही घटना घडली. दोघांचे मृतदेह पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने डोहाबाहेर काढले.

दोघेही आपल्या एकूण 9 मित्रांसह अकोला येथून 15 ऑगस्ट निमित्त चिखलदरा येथे फिरायला गेले होते. त्याच दरम्यान जत्रा डोहात बुडून 26 वर्षीय शेख इकरम शेख हुसेन कुरेशी आणि 27 वर्षीय शेख आजीम शेख सकुर यांचा मृत्यू झाला. दोघेही अकोला शहरातल्या अकोट फाईल भागात राहणारे होते.

Leave a Reply

error: Content is protected !!