मोटारसायकलची धडक : 2 जण ठार

टीम : ईगल आय मीडिया

पाणीव (ता.माळशिरस ) हद्दीतील पालखी मार्गावर असलेल्या घुले वस्तीजवळ दोन मोटारसायकल च्या धडकेत दोन्ही मोटारसायकल स्वार ठार झाल्याची घटना घडली आहे. बुधवारी सायंकाळी 6 च्या सुमारास हा अपघात घडला आहे.

याबाबत चे अधिकचे वृत्त असे की, सांगवी ( ता.फलटण, जि. सातारा ) येथील हनुमंत शंकर बेलदार ( वय 42 वर्षे ) हे आपल्या बुलेट मोटारसायकल ( क्रमांक mh 11 – ck 2727 ) वरून जत ( जि. सांगली ) कडे निघाले होते तर, रावसाहेब सिद ( वय 45 वर्षे ) हे आपल्या मोटारसायकल ( क्रमांक mh45, c 4993) वरून खुडूस येथील शेतातून माळशिरस कडे निघाले होते.

दरम्यान पाणीव हद्दीतील घुले वस्तीजवळ आले असता या दोन्ही मोटारसायकल ची समोरासमोर जोरात धडक झाली. या अपघातात दोघेही मोटारसायकल स्वार ठार झाले आहेत.माळशिरस पोलीस ठाण्यात या अपघाताची सायंकाळी उशिरा नोंद झाली आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!