दोन उमेदवारांनी दिला भगीरथ भालके यांना पाठिंबा

पंढरपूर : ईगल आय मीडिया

पंढरपूर विधानसभा पोटनिवडणूकीत उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या दोन उमेदवारांनी आपले अर्ज माघारी घेत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार भगीरथ भालके यांना पाठिंबा दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशउपाध्यक्ष दीपक साळुंखे यांनी याबद्दल या उमेदवारांचे आभार व्यक्त करून त्यांचा सत्कार केला.

पंढरपूर विधानसभा पोटनिवडणूकीत 19 उमेदवार उतरले असले तरी मुख्य लढत राष्ट्रवादीचे भगीरथ भालके, भाजपचे समाधान अवताडे आणि अपक्ष सिद्धेश्वर अवताडे यांच्यात होत आहे. आज अर्ज माघारी घेण्याच्या मुदतीत 11 जणांनी माघार घेतली.

त्याचवेळी पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे महेंद्र जाधव आणि अपक्ष इलियास हाजी युसुफ शेख यांनी आपला अर्ज माघारी घेत भगीरथ भालके यांना पाठिंबा जाहीर केला. भगीरथ भालके यांच्या कार्यालयात प्रदेशउपाध्यक्ष दीपक साळुंखे, आ. संजय शिंदे यांच्या हस्ते या उमेदवारांचा सत्कार करून त्यांना धन्यवाद दिले.

Leave a Reply

error: Content is protected !!