शोध मोहीम सुरू : नदी काठच्या लोकांना सूचना

पंढरपूर : ईगल आय मीडिया
चिंचोली भोसे ( ता. पंढरपूर ) येथील दोन जण आज दुपारी 12 वाजल्यानंतर एका विवाहित महिलेसह 1 मुलगा असे दोन जण भीमा नदीच्या पाण्यात वाहून गेले आहेत. या दोघांचा शोध घेतला जात असून तालुका पोलिसांनी नदी काठच्या नागरिकांना आणि प्रशासकीय यंत्रणेला ही याबाबत सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत.
चिंचोली भोसे येथील पायल सुग्रीव लोंढे ( वय 18 वर्षे ) ही महिला कपडे धुण्यासाठी भीमा नदीला गेली होती. कपडे धुण्याचे झाल्यानंतर पायल लोंढे आणि जय जाधव पोहण्यासाठी नदीत उतरले. पाण्याला मोठा वेग असल्याने दोघे वाहून गेले आणि बेपत्ता झाली आहेत. भीमा नदीला सध्या पाणी वाहत असल्याने या पाण्यातून ती वाहून गेल्याची शक्यता व्यक्त होत आहे.
घटनेची माहिती मिळताच तालुका पोलीस निरीक्षक किरण अवचर घटनास्थळी दाखल झाले. यावेळी स्थानिक युवकांच्या मदतीने शोध घेण्यात आला मात्र 3 वाजेपर्यंत त्यांचा तपास लागला नाही. स्पीड बोट मागवून घेतली असून शोध कार्य सुरू असल्याची माहिती पो नि. अवचर यांनी दिली.
या पार्श्वभूमीवर भीमा नदीकाठच्या भटुंबरे, शे दुमाला, अजनसोड, मुंडेवाडी, सुस्ते येथील ग्रामसेवक, सरपंच, पोलीस – पाटील आणि नागरिकांनी लक्ष ठेवावे असे आवाहन तालुका पोलीस निरीक्षक किरण अवचर यांनी केले आहे.