राज्यात आजवर २ लाख ४९ हजार लोक कोरोनमुक्त

मृत्यू दर केवळ ३. ५८ टक्के : १ लाख ४८ हजार पॉझिटिव्ह रुग्ण

टीम : ईगल आय मीडिया
राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ४ लाखांवर गेली असली तरीही एकूण रुग्ण रे होण्याचे प्रमाण ६० टक्के पेक्षा जास्त आहे. राज्यात आतापर्यंत २ लाख ४८ हजार ६१५ उपचारानंतर पूर्ण बरे झाले असून घऱी पाठवण्यात आलं आहे. राज्यातील रिकव्हरी रेट सध्या ६०.७३ टक्के इतका आहे. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या २० लाख ७० हजार १२८ नमुन्यांपैकी ४ लाख ११ हजार ७९८ नमुने पॉझिटिव्ह (१९.८९ टक्के) आले आहेत. राज्यात गुरुवारी २६६ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर ३.५८ टक्के इतका आहे. आरोग्य विभागाकडून ही माहिती देण्यात आली आहे.

राज्यात गुरुवार ( दि ३० जुलै ) दिवसभरात ११ हजार १४७ नव्या करोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. आतापर्यंतची ही सर्वाधिक रुग्णनोंद आहे. यासोबत एकूण करोनाबाधित रुग्णसंख्या ४ लाख ११ हजार ७९८ इतकी झाली आहे. यामधील २ लाख ४८ हजार ६१५ रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून १ लाख ४८ हजार १५० अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. दिवसभरात ८८६० रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. राज्यात ९ लाख ४ हजार १४१ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ४० हजार ५४६ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

मुंबई सुद्धा नियंत्रणात !

दरम्यान, गुरुवारी मुंबईत १२२३ नवे रुग्ण आढळले असून एकूण बाधितांचा आकडा १ लाख १३ हजारांवर गेला आहे. तर ५३ जणांचा मृत्यू झाला असून आतापर्यंत ६२९७ रुग्णांचा करोनाने बळी गेला आहे. मुंबईत सध्या २०,२११ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

मुंबईतील चाचण्यांची संख्या गेल्या काही दिवसांपासून वाढवण्यात आली असून बुधवारी दिवसभरात १०,७३२ चाचण्या करण्यात आल्या. गुरुवारी १२२३ नव्या रुग्णांची नोंद झाली तर १०५८ रुग्ण बरे झाले आहेत. मुंबईत आतापर्यंत ८६,३८५ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे मुंबईतील परिस्थिती सुद्धा नियंत्रणात आल्याचे मानले जात आहे .

Leave a Reply

error: Content is protected !!