दोन अपघातात दोन शाळकरी मुलींचा मृत्यू : तर दोन मुले जखमी


पंढरपूर : eagle eye news

भावासोबत मोटासायकलवरून निघालेल्या दोन बहिणींचा दोन वेगवगळ्या अपघातात मृत्यू झाला आहे. राधा आवटे आणि अक्षरा जमदाडे अशी दोन्ही मुलींची नावे आहेत.दोन्ही अपघातातील मुलींचे भाऊ जखमी झाले आहेत. या घटनेचे वृत्त समजताच तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.


पहिल्या घटनेत अक्षरा देविदास जमदाडे ( वय १४ वर्षे )  ( रा. भोसे, ता. पंढरपूर ) ही शाळकरी मुलगी आपल्या भावासोबत सकाळी आकरा वाजण्याच्या सुमारास शाळेतून घरी जात होती. करकंब – मार्गावर  भोसे पाटी चौकात  आल्यानंतर बाजूला उभा राहिलेले अशोक लेलँड कंपनीच्या पिकआप ( क्र.एम एच १३, ए एन ८२३३ ) च्या चालकाने दरवाजा उघडला. त्यामुळे दरवाजाला धडकून मोटारसायकल ( क्र. एम एच १४, सी एक्स ८०५२ ) पडली. त्याचवेळी मागून आलेल्या ट्रॅक्टरच्या चाकाखाली अक्षरा पडल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. तर भाऊ किरकोळ जखमी झाला आहे.  या अपघाताची रात्री उशिरा पर्यंत करकांब पोलीस ठाण्यात नोंद झालेली नव्हती. 


दुसऱ्या घटनेत दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास पेहे केंद्रावरून दहावीचा पहिला पेपर देऊन आपल्या बहिणीकडे ढेकळेवाडी या  गावाला जात असताना रस्त्याच्या बाजूला असलेले जळके झाड अंगावर पडून राधा नागनाथ आवटे ( रा. बादलकोट, ता. पंढरपूर ) हीचा जागीच मृत्यू झाला. तर या ही घटनेत राधा हीचाभाऊ संदीप आवटे याला किरकोळ जखम झाली, ही घटना पावणेतीन च्या सुमारास घडली .या घटनेची करकंब पोलीस ठाण्यात नोंद झाली असून पोलिस पुढील तपास करीत आहेत.

Leave a Reply

error: Content is protected !!