मंगळवेढा तालुक्यात अपघात : 2 जण ठार

अपघातास कारणीभूत ठरलेला सिमेंट मिक्स टँकर ( छायाचित्रे : दत्ता कांबळे, रड्डे, ता.मंगळवेढा )

मंगळवेढा : ईगल आय मीडिया

मंगळवेढा तालुक्यातील पाटखळ-खुपसंगी रोडवर पाटखळ गावाजवळ झालेल्या अपघातात मोटार सायकलवरील दोन जण जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे. गोविंद बुरुंगे आणि चिलप्पा बुरुंगे अशी मयतांची नावे आहेत.

शुक्रवारी दुपारी गोविंद बुरंगे आणि चिलप्पा बुरुंगे हे दोघेही मौजे हिवरगाव येथून साखरपुडा उरकून बुरुंगेवाडी (जवळा) मोटारसायकल (क्र.एम.एच ९ एच ९२१८) वरून परत जात होते. त्यावेळी पाटखळ गावाजवळ सिमेंट टँकर (के.ए .४८.५१२२) ला धडक बसली. यावेळी दोघेही दुचाकीस्वार गंभीर जखमी होवून उपचारांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.


अपघात एवढा मोठा होता की, मोटरसायकलवरील एकजण उडूूून बाजूला फेकला  गेला, तर दुसऱ्या व्यक्तीच्या दोन्ही पायावरून सिमेंट टँकरची चाकेे गेल्याने गंभिर जखमी झाला तर मोटरसायकलचाही चेंदामेंदा झाला होता.

Leave a Reply

error: Content is protected !!