कंटेनर ने दोघांनाही चिरडल्याचे छायाचित्रात दिसत आहे.
पंढरपूर : ईगल आय मीडिया
तुंगत (ता. पंढरपूर) येथील दोघा जणांचा बाळे ( सोलापूर ) जवळ कंटेनर च्या धडकेत मृत्यू झाला आहे. रविवारी रात्री साडे दहा वाजता हा अपघात पुणे – सोलापूर महामार्गावर झाला आहे.
सारंग प्रकाश रणदिवे आणि संजय विठोबा अमंगे हे दोघेजण लातूरहून तुंगतकडे येत होते. बाळे परिसरात हॉटेल सुयोग समोर आले असता त्यांची कार ( क्र. Mh 13, az 7234 ) पंक्चर झाली. यावेळी रोडवर थांबूनच हे दोघे टायर खोलत होते. त्याचवेळी पाठीमागून आलेल्या ट्रकचालकास ते दिसले नाहीत.
सारंग रणदिवे हे तुंगेश्वर हायस्कूल चे मा.मुख्याध्यापक प्रकाश रणदिवे यांचा व्दितीय चिरंजीव आहेत तर त्यांचे पश्चात पत्नी एक लहान मुलगी,वडील ,आई ,भाऊ,दोन बहिणी असा परिवार आहे. ते शेती व्यवसाय करीत होते. तर संजय अमंगे हे गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील खाजगी प्राथमिक शाळेत मुख्याध्यापक म्हणून काम करीत होते. त्यांचे वडील तुंगेश्वर हायस्कूल येथै नौकरी करीत आहेत. या तरूणांच्या अकस्मात निधनाने तुंगत व मानेवाडी ( ता.मंगळवेढा ) गावात हळहळ पसरली आहे.
कंटेनर ट्रक ( क्र. cg 04, mp 1457 ) या ट्रकने चारचाकीला धडक दिल्याने पंक्चर काढणारे दोघे जागीच ठार झाले. अपघातानंतर ट्रकचालक पसार झाला आहे, अशी माहिती तेथील पोलिसांनी दिली. ट्रक ताब्यात घेतला असून आता चाके जाम झालेली चारचाकी क्रेनने काढण्यात आली.