भाजी विक्रेत्या महिलेसह बांधकाम मजुराचा बळी

टीम : ईगल आय मीडिया
सोलापूर येथील अक्कलकोट रोडवरील मल्लिकार्जुन नगराजवळ भरधाव ट्रकने भाजीपाला विक्रेत्यांना धडक दिल्याने 2 जण जागीच ठार झालेत. तर अन्य दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत.
अपघातातील मृतव्यक्ती भाजी विक्रेती महिला जुलेखा शेख (, वय 58 वर्षे) दुचाकीस्वार मोहसीन नदाफ ( गवंडी कामगार ) आहेत. आणि जखमींची नावे अद्याप समजली नाहीत.
शुक्रवारी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला आहे. अपघातानंतर अक्कलकोट रोडवरील वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलिसांनी क्रेन च्या साहाय्याने ट्रक बाजूला काढून वाहतूक सुरळीत केली.