एकलासपूरजवळ अपघात : 2 युवकांचा मृत्यू


पंढरपूर : ईगल आय न्यूज


पंढरपूर – मंगळवेढा मार्गावरील एकलासपूरजवळ कार आणि मोटारसायकल यांच्यात समोरासमोर झालेल्या अपघातात दुचाकीवरील 2 जण ठार झाले आहेत. अपघातग्रस्त मोटारसायकलवरील दोघेही मंगळवेढा येथील आहेत. 

सोमवारी रात्री साडे आठ वाजण्याच्या सुमारास पंढरपूर हुन अण्णासाहेब दत्तात्रय सावंजी ( वय 28 वर्षे ) आणि विजय दादासाहेब सावंजी ( वय 22 वर्षे )   हे दोघे त्यांच्या मोटारसायकल वरून मंगळवेढयाकडे जात होते.  एकलासपूरजवळ मंगळवेढ्याकडून येणाऱ्या कार ( क्र. एम एच13, dt 8485 ) सोबत मोटारसायकल ची समोरासमोर धडक झाली. 

शेवटचा श्रावणी सोमवार ठरला आयुष्यातील शेवटचा !

दोघेही शेवटच्या श्रावणी सोमवार निमित्त शिखर शिंगणापूर येथे महादेवाच्या दर्शनासाठी गेले होते, गावाकडे परत जात असताना हा अपघात झाल्याचे समजते. मृतांपैकी अण्णासाहेब सावंजी याचा मागील वर्षी विवाह झाला होता. त्यामुळे या अपघाताची बातमी समजताच मंगळवेढा शहरात हळहळ व्यक्त होत आहे.

या अपघातात अण्णासाहेब सावंजी  हा जागीच ठार झाला. तर जखमी विजय सावंजी यास उपचारासाठी तातडीने लाईफ लाईन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते, मात्र त्याठिकाणी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे. अपघाताचे वृत्त समजताच पंढरपूर, मंगळवेढा तालुक्यात खळबळ उडाली आहे.

3 thoughts on “एकलासपूरजवळ अपघात : 2 युवकांचा मृत्यू

  1. Pandharpur mangalwedha road var roj accident hotat ……. Kuthe hi sign board naahi. Speed breaker naahi……speed limit board nahi ,pudhe gaav,shala, squares aahe kahihi naahi..
    Rojch aahe ase

Leave a Reply

error: Content is protected !!