माळशिरस तालुक्यातील दोन युवकांचे IAS परीक्षेत यश

वाघोली येथील सागर मिसाळ ; शिंदेवाडी च्या शुभम जाधवची निवड

टीम : ईगल आत मीडिया


वाघोली( ता माळशिरस ) येथील शेतकऱ्याचा मुलगा श्री सागर भारत मिसाळ UPSC च्या परीक्षेत ३५४ ऱ्यांक ने पास होऊन यश संपादन केले आहे.दरम्यान, शिंदेवाडी (ता.माळशिरस ) येथील शुभम जाधव यानेही आय ए एस परीक्षेत यश मिळवले आहे.

जिल्हाधिकारी व्हायचे स्वप्न मनी बाळगून सागर मिसाळ यांनी हा दुसरा प्रयत्न केला होता, त्यातही यश प्राप्त केले .या यशा बद्धल श्री सागर मिसाळ यांचे सर्वत्र कौतुक होत असून अभिनंदन करण्यात येत आहे.


सागर मिसाळ हे भारत जालिंदर मिसाळ या शेतकरी कुटुंबातील असून थोड्या फार शेतीत आई वडिलांनी कष्ट करून सागर मिसाळ व त्याच्या लहान भावाला शिक्षण दिले आहे. भारत मिसाळ यांचा दुसरा मुलगाही UPSC चा अभ्यास करीत आहे. सागर मिसाळ यांचे प्राथमिक शिक्षण वाघोली जिल्हा परिषद शाळेत होऊन माध्यमिक शिक्षण सदाशिवराव माने विद्यालय अकलूज येथे झाले आहे. कृषी पदवी घेऊन UPSC अभ्यास करीत होते

“काहीतरी यश माझ्या हाताला लागलं आहे. एवढ्या वर्षांची प्रतीक्षा फळाला आली. आईवडील, नातेवाईक आणि गुरुजनांच्या पाठिंब्यांमुळे हे शक्य झालं. माझे आत्ये भाऊ अमोल क्षीरसागर यांनी मला मला फार मदत केली पाठिंबा दिला, प्रोत्साह दिलं. त्यामुळे इथपर्यंत पोहोचणं शक्य झालं आहे, असं शुभम यांनी बोलताना म्हटलं आहे.

शेतकऱ्याचा मुलगा आयएएस
शिंदेवाडी गावात राहणाऱ्या शुभम जाधव यांचा 445 वा क्रमांक आला आहे. शुभम जाधव यांचे आईवडील शेती करतात. पाचव्या प्रयत्नामध्ये त्यांना हे यश आलं आहे. त्यांनी आधी तीन वेळा मुलाखतीपर्यंत मजल मारली आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!