उजनीतून विसर्ग 50 हजार क्यूसेक्स चा विसर्ग सुरू

उजनी धरण व्यवस्थापन झाले सतर्क : हवामान खात्याचा ईशारा घेतला गांभीर्याने

पंढरपूर : ईगल आय मीडिया

हवामान खात्याने पुढील 4 दिवस पावसाचा अंदाज वर्तवल्याने उजनी धरणातून आज पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला आहे. रवीवारी सायंकाळी 40 हजार क्यूसेक्स चा विसर्ग वाढवून रात्री साडे अकरा वाजता 50 हजार क्यूसेक्स केलेला आहे.

आज सकाळी त्यात कोणताही बदल न करता 50 हजार क्यूसेक्स ने विसर्ग सुरू ठेवला आहे. सकाळी दौंड येथील विसर्ग काही प्रमाणात कमी झाला असून 8 वाजता तो 9 हजार क्यूसेक्स वर होता.

वीर धरणातील विसर्ग रविवारी पुन्हा सुरू करण्यात आला असून आज सकाळी तो 5 हजार 437 क्यूसेक्स इतका करण्यात आलेला आहे.

मागील आठवड्यात उजनी धरण व्यवस्थापनाने केलेल्या गंभीर चुकीमुळे जिल्ह्यात महापूर आला होता. ती चूक या आठवड्यात टाळत उजनी धरण व्यवस्थापनाने हवामान विभागाचा अतिवृष्टीचा ईशारा गंभीरपणे घेतला असल्याचे दिसते. त्यामुळे ईशारा मिळताच धरणातून विसर्ग वाढवून पूर स्थिती नियंत्रणात राहील याची काळजी घेतल्याचे दिसून येते.

Leave a Reply

error: Content is protected !!