आता भीमेला पूर : उजनीतून 50 हजार क्यूसेक्स चा विसर्ग

वीर मधून 13 हजार क्यूसेक्सचा विसर्ग सुरू

पंढरपूर : ईगल आय मीडिया

संपूर्ण सोलापूर जिल्ह्यास पावसाने झोडपून काढले असताना आता भीमा नदीला पूर येणार आहे. उजनी धरणातून भीमा नदीला 50 हजार क्यूसेक्स ने पाणी सोडले असून वीर धरणातून 13 हजार क्यूसेक्स चा विसर्ग सुरू आले.

गेल्या काही दिवसांपासून सोलापूर जिल्ह्यातील शेतकरऱ्यांना पावसाने झोडपून काढले असून शेतीचे अपरिमित।नुकसान झाले आहे. हे कमी होते म्हणून की काय आता भीमा नदीला पूर येतो आहे. आज ( बुधवारी ) दुपारी 4 वाजता 16 दरवाजे उघडून भीमा नदीत उजनीतून 50 हजार क्यूसेक्स इतका विसर्ग सोडला आहे.

तर वीर धरणातून 13 हजार क्यूसेक्स चा विसर्ग सुरू केला आहे. त्याचबरोबर माळशिरस, सांगोला, पंढरपूर,माढा, मोहोळ तालुक्यातील पावसाने नदी, नाले, ओढे दुथडी भरून वाहत आहेत. त्यामुळे भीमा नदीला सुमारे 1 लाख क्यूसेक्स चा विसर्ग राहण्याची शक्यता आहे. त्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने नदी काठच्या नागरिकांना सावधानतेचा ईशारा दिला आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!