पावसाचा जोर ओसरला तरीही पाण्याची आवक कायम
पंढरपूर : ईगल आय मीडिया
सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी वरदान असलेले उजनी धरण आता साठ टक्केच्यावर भरले आहे. पुणे जिल्ह्यातील पाऊस थांबला असला तरी उजनीत येणाऱ्या पाण्याचा विसर्ग चांगला असल्यामुळे धरणातील पाणी पातळी वाढ कायम आहे. दरम्यान पावसाने विश्रांती घेतल्याने वीर धरणातून नीरा नदीला सोडण्यात येणारा विसर्ग बुधवारी सकाळी बंद करण्यात आला आहे.
उजनी धरण हे सोलापूर जिल्ह्यातील शेतीस व पिण्याच्या पाण्यासाठी महत्त्वाचे आहे. त्यामुळे या धरणातील पाणीसाठ्याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागलेले असते. यंदाच्या वर्षी उजनी उणे 14 टक्केपर्यंत खालावले होते. परंतु यंदाच्या हंगामात धरण क्षेत्रात 490 मिलिमीटर इतका विक्रमी पाऊस झाल्यामुळे उजनीतील पाणी साठा सातत्याने वधारत आला आहे. मागील पंधरा दिवसापासून पुणे जिल्ह्यातील सर्व धरणांवर मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस झाल्यामुळे उजनीत येणाऱ्या पाण्याचा विसर्ग वाढलेला आहे. मागील दहा दिवसांपासून उजनी धरणात दहा ते वीस हजार क्यूसेक्स एवढा पाण्याचा विसर्ग दररोज येतो आहे. त्यामुळे उजनीच्या पाण्यासाठ्यात वेगाने वाढ होत आहे.
बुधवारी सकाळी आठ वाजता उजनीत येणारा निसर्ग पुणे बंडगार्डन येथे 12 हजार 421 एवढा होता, तर दौंड येथे हाच विसर्ग 16 हजार 350 क्यूसेक्स एवढा आहे. त्यामुळे उजनी धरणातील पाण्याची वाढ कायम राहणार आहे. मंगळवार बुधवारी सकाळी आठ वाजता उजनीतील पाण्याचा साठा 59. 91% झाला होता, तर नऊ वाजता हाच साठा वाढून 61% इतका झाला होता.
उजनी धरणाने पाणीसाठ्याची ‘ साठी ‘ गाठल्यामुळे यंदा धरण शंभर टक्के भरण्याची खात्री झालेली आहे. दरम्यान, मागील दोन दिवसापासून पुणे जिल्ह्यातील धरण क्षेत्रावरील पावसाचा जोर ओसरला आहे ल. सरासरी सर्व धरणाचा पाणीसाठा 70 टक्के पेक्षा अधिक झाला असून आणखी सुमारे एक महिना पावसाचा हंगाम शिल्लक आहे. त्यामुळे उजनी 100 टक्के भरले औपचारिकता उरली आहे.
वीरचा विसर्ग बंद केला
नीरा नदीच्या खोऱ्यात मागील पंधरा दिवसात दमदार पाऊस झाल्यामुळे चारही धरणातील पाणीसाठा 90 टक्केच्या वर झाला आहे. त्याच बरोबर नीरा खोऱ्यातील पावसाने विश्रांती घेतल्यामुळे धरणात येणारी आवक कमी झाल्यामुळे वीर धरणातून नीरा नदीला सोडण्यात येणार आहे निसर्ग पूर्णपणे बंद करण्यात आलेला आहे. वीज निर्मिती प्रकल्पासाठी 800 क्यूसेक्स पाणी सोडण्यात येत आहे. पावसाचे प्रमाण पाहता वीर मधून पुन्हा पाणी सोडले जाऊ शकते अशी शक्यता नीरा उजवा कालवा विभागाकडून व्यक्त करण्यात आली आहे.