उजनी ‘प्लस’ मध्ये आले !

आता शंभरीकडे वाटचाल सुरू

टीम : ईगल आय मीडिया

मागील दोन दिवसांपासून पुणे जिल्ह्यात सुरू असलेल्या दमदार पावसामुळे भीमा नदीच्या विसर्गात वाढ झाली असून आज दुपारी 6 वाजता उजनी धरण प्लस पातळीला आले आहे. बंडगार्डन 27 हजार क्यूसेक्स तर आणि दौंड येथून येणारा विसर्ग 15 हजार क्यूसेक्स वाढला आहे. त्यामुळे यापुढे धरण पूर्णक्षमतेने म्हणजेच 111 टक्के भरण्यास किती दिवस लागतात याकडे आता जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे डोळे लागले आहेत.

संबंधित वृत्त वाचा !

यंदा पुणे जिल्ह्यातील सर्वच धरणावर पावसाने ओढ दिलेली होती, त्यामुळे उणे 22 टक्के भरण्यास 7 आठवड्याचा कालावधी गेला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत पाऊस कमी झाला असून त्यामुळे उजनी धरणाच्या पाणी साठ्यात कासवगतीने वाढ सुरू आहे. मागील 3 दिवसात भीमेच्या खोऱ्यात मुसळधार पाऊस झाल्याने धरणाची पाणी पातळी वेगाने वाढीस लागली आहे.

आज सायं.6..00. वा धरणातील पाणी पातळी ! टक्केवारी +0.07%
उजनीत येणारा विसर्ग
दौंड – 15385 क्युसेक
बंडगार्डन – 27647 क्यूसेक्स

दौंड येथुन उजनी धरणामध्ये 9704 क्युसेक वेगाने पाणी येत आहे. यावर्षी उजनीच्या पाण्याचे नियोजन काटेकोरपणे केल्याने उजनी मायनस पातळी -22.42 टक्के पर्यंत खाली आले होते. त्यामुळे उजनीचा मायनसचा विळखा लवकर निसटणार हे नक्की झाले होते. त्यामुळेच केवळ उजनीच्या पाणलोट क्षेत्रात पडलेल्या पावसामुळे उजनी मायनसमधून प्लसमध्ये आले आहे.

पण आतापर्यंत उजनीवरील 19 धरणाच्या पाणलोट क्षेत्रात आणखी उजनीला फायदा होईल, असा पाऊस सुरु झालेला नव्हता. परंतु काल पासून उजनी पाणलोट क्षेत्रात पावसाने जोरदार सुरुवात केल्यामुळे सध्या उजनीत येणाऱ्या विसर्गात वाढ होताना दिसत आहे. 

Leave a Reply

error: Content is protected !!