उजनीचा २० हजार तर वीर चा विसर्ग 33 हजार क्युसेक्स

भिमेची पाणी पातळी वाढणार

पंढरपूर : ईगल आय न्यूज

उजनी धरणातून भीमा नदीचा विसर्ग २० हजार क्यूसेक इतका करण्यात आलेला असून वीर धरणातून 33 हजार क्यूसे चा विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे. त्यामुळे भीमा नदीची पाणी पातळी रविवारी 50 हजार कयुसे पर्यंत वाढण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर नदीकाठच्या नागरिकांनी सावधानता बाळगावी असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

आज शनिवारी दिनांक सकाळी वीर धरण १०० भरलेले असून पाणी पातळी मध्ये काही प्रमाणात वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. तसेच भाटघर व निरा देवघर धरणातून विद्युत गृहाद्वारे विसर्ग सुरू असून वीर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये देखील पाऊस पडत आहे. आज दुपारी १२ वाजता पुणे जिल्ह्यातील खडकवासला धरणातून ही ४ हजार ७०० क्यू इतका विसर्ग चालू करण्यात आलेला आहे.

वीर धरणाच्या पाणी पातळीत वाढ होत असल्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार आज दिनांक २४/०८/२०२४ रोजी सकाळी ११.१५ वाजता निरा नदीमध्ये वीर धरणाच्या निरा डाव्या कालव्यास ३०० क्युसेक्स विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे. तर निरा उजव्या कालव्याच्या १००० क्युसेक्स विसर्ग सुरू करण्यात आला आहे.

वीर धरणाच्या सांडव्याद्वारे २३१८५ क्यसेक्स विसर्गामध्ये वाढ करून ३२४५९ क्यसेक्स इतका विसर्ग सुरू करण्यात येत शेनआहे.आता निरा नदीमध्ये काहीकाळ एकूण विसर्ग ३३७५९ क्युसेक्स असणार आहे. पावसाचे प्रमाण व तीव्रता लक्षात घेता विसर्गामध्ये बदल करण्यात येईल.

त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, कोणतीही अनुचित घटना घडल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधितांची राहील याची नोंद घ्यावी, असे आवाहन कार्यकारी अभियंता,नीरा उजवा कालवा विभाग यांनी केले आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!