उजनी 1 लाख 20 तर वीर 23 हजार क्यूसेक्स चा विसर्ग

भीमेकाठच्या गावांना सावधानतेचा ईशारा : सुरक्षित ठिकाणी जा !

पंढरपूर : ईगल आय मीडिया

उजनी धरणावर झालेल्या अतिवृष्टीमुळे बुधवारी सायंकाळी उजनीतून सोडला जाणारा विसर्ग 1 लाख 20 क्यूसेक्स तर वीर धरणातून सोडला जाणारा विसर्ग 23 हजार क्यूसेक्स करण्यात आला आहे. प्रशासनाने भीमा नदीकाठच्या गावांना सावधानतेचा ईशारा दिला आहे. भीमा नदीला पूर येणार आहे.

गेल्या काही दिवसांपासून सोलापूर जिल्ह्यातील शेतकरऱ्यांना पावसाने झोडपून काढले असून शेतीचे अपरिमित नुकसान झाले आहे. आज ( बुधवारी ) दुपारी 4 वाजता भीमा नदीत उजनीतून 50 हजार क्यूसेक्स इतका विसर्ग सोडला होता. त्यात वाढ करून सायंकाळी साडे सहा वाजता 1 लाख क्यूसेक्स करण्यात आला तर वीर धरणातून 13 हजार क्यूसेक्स चा विसर्ग सुरू होता. त्यात सायंकाळी 7 वाजता वाढ करून 23 हजार क्यूसेक्स करण्यात आला आहे.

बुधवारी माळशिरस, सांगोला, पंढरपूर,माढा, मोहोळ तालुक्यातील पावसाने नदी, नाले, ओढे दुथडी भरून वाहत आहेत. त्यामुळे भीमा नदीला सुमारे 1 लाख क्यूसेक्स चा विसर्ग राहण्याची शक्यता आहे. त्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने नदी काठच्या नागरिकांना सावधानतेचा ईशारा दिला आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!