रात्री 20 ; सकाळी 15 हजार क्यूसेक्स

भीमा नदीला उजनीतील विसर्ग कायम !

पंढरपूर : ईगल आय मीडिया

उजनी धरणातून भीमा नदीला सोडण्यात येणारे पाणी सोमवारी रात्री साडेदहा वाजता वाढवण्यात आले होते. मात्र सकाळी 6 वाजता पुन्हा त्यात कपात करण्यात आली आहे. पुणे जिल्ह्यातील मुळा- मुठा खोऱ्यात पाऊस सुरू असल्याने धरणात येणारी पाण्याची आवक कायम आहे. त्यामुळे उजनी धरणातून भीमेला पाणी सोडण्याचे प्रमाण ही 15 हजार क्यूसेक्स एवढे कायम आहे.

उजनी धरण क्षेत्रात रविवारी रात्री 100 मिमी एवढा तुफान पाऊस पडला आहे. त्यामुळे सोमवारी सकाळी 6 वाजता उजनीतून भीमा नदीला 15 हजार क्यूसेक्सने पाणी सोडण्यात आले आहे. नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. रात्री साडे दहा वाजता हा विसर्ग वाढवून 20 हजार क्यूसेक्स करण्यात आला होता.
मात्र मंगळवारी सकाळी 6 वाजता हा विसर्ग पुन्हा कमी करण्यात आला असून 16 हजार क्यूसे. करण्यात आला आहे.

त्याचबरोबर उजनी डावा, उजवा कालवा, भीमा -सिना, उपसा सिंचन योजना, वीजनिर्मिती साठीही पाणी सोडण्यात येत आहे. दौंड येथे येणारा विसर्ग 6 हजार 64 क्यूसेक्स एवढा आहे.

दरम्यान, वीर धरणांतून सोडण्यात येणारा विसर्ग सोमवारी रात्री बंद करण्यात आला आला आहे.
तसेच पावसाच्या प्रमाणानुसार विसर्गामध्ये बदल होऊ शकतो याची नोंद घेण्यात यावी.नदीकाठच्या सर्वांनी काळजी घ्यावी ,नीरा नदी पात्रात कोणीही जाऊ नये. तरी सर्वांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!