पंढरीत मध्यवस्तीत पुराचे पाणी शिरले
पंढरपूर : ईगल आय मीडिया
महापुरामुळे हैराण झालेल्या भीमा काठच्या नागरिकांना दिलासादायक वृत्त असून पाऊस मंदावला असल्याने उजनीतून सोडण्यात येणारा विसर्ग 80 हजार क्यूसेक्स पर्यन्त कमी करण्यात आलेला आहे. तर वीर धरणाचा विसर्ग ही 4 हजार क्यूसेक्स पर्यंत कमी झाला आहे.
दरम्यान, आज सकाळी पंढरपूर येथे भीमेची पातळी 2 लाख 87 हजार क्यूसेक्स इतकी असून शहरातील मध्यभागात पुराचे पाणी आलेले आहे. तर नीरा नरसिंहपूर येथे भीमेची पातळी 2 लाख 50 हजार क्यूसेक्स इतकी आहे.
पुणे जिल्ह्यासह उजनीच्या पाणलोट क्षेत्रातील पावसाचा जोर मंदावला आहे. त्यामुळे उजनीतून सोडण्यात येणारा विसर्ग शुक्रवारी सकाळी 8 वाजता 80 हजार क्यूसेक्स करण्यात आलेला आहे. त्यामुळे भीमेची पूरस्थिती नियंत्रणात राहणार आहे.