जलसंपदा मंत्र्यांची घोषणा
पंढरपूर : ईगल आय मीडिया
सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून, राज्य सरकारने उजनीतुन इंदापूर तालुक्यातील 22 गावांसाठी 5 टीएमसी पाणी उचलण्याचा निर्णय मागे रद्द केला आहे. राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी आज ही घोषणा केली.

यावेळी आ.संजय शिंदे, आ.यशवंत माने, सहकार शिरोमणीचे अध्यक्ष कल्याणराव काळे, राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष उमेश पाटील, माजी आम दीपक साळुंखे, उत्तमराव जानकर आदी उपस्थित होते.
यावेळी ना.पाटील म्हनाले की आ. शिंदे यांच्यासह जिल्ह्यातील अनेक नेत्यांनी, शेतकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार 22 एप्रिल रोजी काढलेला सर्व्हेक्षणाचा आदेश रद्द करण्यात आलेला आहे. सोलापूर जिल्ह्याचे एक थेंब भर पाणी सुद्धा कुठे वळवले जाणार नाही. जिल्ह्यातील पाण्याला कसलाही धक्का लागणार नाही याची मी ग्वाही दिलेली आहे.
त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी गैरसमज करून घेऊ नये, अशी विनंती पाटील यांनी केली. ना.पाटील यांनी 5 टीएमसी पाणी उचलण्यासंदर्भातील सर्व्हेक्षणाचा आदेश रद्द केल्याची घोषणा केल्यानंतर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला आहे.
हा जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा विजय !
दरम्यान उजनी पाणी बचाव संघर्ष समितीचे सचिव माऊली हळणवर यांनी, जलसंपदा मंत्री यांनी केलेली सर्व्हेक्षण रद्द ची घोषणा हा जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा विजय आहे,मंत्री जयंत पाटील यांनी हा आदेश रद्द केल्याचे सांगितले. मात्र या रद्द केलेल्या आदेशावर जोपर्यंत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची स्वाक्षरी होत नाही, तोपर्यंत आम्ही हा लढा, ही चळवळ अखंडपणे चालू ठेवणार आहोत. अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.