पंढरपूर : ईगल आय मीडिया
बाभुळगाव ( ता. पंढरपूर ) ते नारायणचिंचोली या दोन गावांना जोडणारा उजनी कॅनाल ३८ वरील पूल दोन दिवसापूर्वी कोसळला. यामुळे नारायणचिंचोली, ईश्वरवठार, भैरवनाथवाडी, येथील नागरिकांना ये-जा करण्यासाठी मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
बाभूळगाव आणि नारायणचिंचोली या दोन्ही गावांना जोडणाऱ्या मार्गावर हा पूल उजनी कालव्यावर होता. सुमारे 30 वर्षांपूर्वी उभारलेला हा पूल जीर्ण झाला होता आणि तो कोसळेल याबाबत नागरिकांनी भीमा पाटबंधारे विभागाकडे अनेकवेळा तक्रारी केल्या होत्या. मात्र त्याकडे दुर्लक्ष केल्याने अखेर सोमवारी हा पूल कोसळला असून या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे.
अद्यापही या ठिकाणी कोणताही अधिकार आलेला नाही किंवा साधी विचारणा ही केलेली नाही.
त्यामुळे बाभुळगाव, नारायणचिंचोली, ईश्वरवठार, भैरवनाथवाडी आदी गावातील नागरिकांमध्ये पाटबंधारे विभागाचा विषयी संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
सध्या पावसाळ्याचे दिवस सुरु आहेत नागरिकांना ये-जा करण्यासाठी हा मार्ग बंद झाल्याने दुष्काळात तेरावा महिना अशी अवस्था या भागातील नागरिकांची झालेले आहे.
या पुला संदर्भात रोपळे उजनी पाटबंधारे विभाग यांना वारंवार सूचना करतोय परंतु या पुलाबाबत कोणतीही दक्षता घेतली नसल्याने हा पूल कोसळला आहे. यामध्ये उजनी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांचे पूर्णपणे जबाबदारी आहे,असे येथील शेतकऱ्यांमधून बोलले जात आहे.
सविस्तर माहितीसाठी व्हीडिओ पहा
आणि you tube channel ला
subscribe करा